कोल्हापूर : पावसाचे आगमन करणारा म्हणून ओळखला जाणारा जून महिना सुरु झाला असताना कोल्हापूर जिल्ह्यात आणखी एकदा पाणी उपसा करणारा आदेश लागू करण्यात आला आहे.

पंचगंगा नदीची शिंगणापूर अधोबाजू ते इचलकरंजी तसेच दुधगंगा उजवा मुख्य कालव्याच्या दोन्ही तीरावरील भागामध्ये शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या उपसा यंत्रावर ४ ते ६ जून पाणी उपसाबंदी करण्याचे आदेश पाटबंधारे विभाग (उत्तर) चे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी गुरुवारी दिले आहेत. उपसा आढळून आल्यास उपसायंत्र जप्त करुन उपसा परवाना १ वर्षाच्या कालावधीसाठी रद्द करण्यात येईल, असेही त्यांनी कळविले आहे.

kolapur crime news, kolhapur murder marathi news
कोल्हापुरात सराईत गुन्हेगाराचा निर्घृण खून
thane district, administration, thane water supply department
लोकसत्ता इम्पॅक्ट : ठाणे जिल्हा प्रशासन जागे झाले, पाणी टंचाई आधीच टँकर सुरू करण्याच्या दिल्या सूचना
In Ralegaon taluka a young man and an old man were killed in Nepal
राळेगाव तालुक्यात रक्तरंजीत होळी; नेपाळच्या तरुणासह वृद्धाची हत्या
Mild earthquake tremors in Akola district
अकोला जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य हादरे

हेही वाचा >>>कोल्हापूर: पावणे दोन कोटीच्या अपहार प्रकरणी बडा सुत व्यापारी पंकज अग्रवाल अटकेत

शेतकऱ्यांमध्ये नाराजी

पाण्याची टंचाई, मनासारखा वळीव पाऊस पडलेला नाही आणि दुसरीकडे पिके वाळत चालली आहेत. त्यामुळे उपसा बंदी मागे घ्यावी अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा शेतकऱ्यांनी पाटबंधारे कार्यालयात जावून दिला असताना आज पूर्वीचा आदेश पाटबंधारे विभागाने लागू केल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.