Premium

कोल्हापुरातील पंचगंगा, भोगावती नदीत पुन्हा पाणी उपसाबंदी; शेतकरी संतापले

पावसाचे आगमन करणारा म्हणून ओळखला जाणारा जून महिना सुरु झाला असताना कोल्हापूर जिल्ह्यात आणखी एकदा पाणी उपसा करणारा आदेश लागू करण्यात आला आहे.

Water diversion in Panchganga Bhogavati river in Kolhapur again
कोल्हापुरातील पंचगंगा, भोगावती नदीत पुन्हा पाणी उपसाबंदी( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

कोल्हापूर : पावसाचे आगमन करणारा म्हणून ओळखला जाणारा जून महिना सुरु झाला असताना कोल्हापूर जिल्ह्यात आणखी एकदा पाणी उपसा करणारा आदेश लागू करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंचगंगा नदीची शिंगणापूर अधोबाजू ते इचलकरंजी तसेच दुधगंगा उजवा मुख्य कालव्याच्या दोन्ही तीरावरील भागामध्ये शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या उपसा यंत्रावर ४ ते ६ जून पाणी उपसाबंदी करण्याचे आदेश पाटबंधारे विभाग (उत्तर) चे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी गुरुवारी दिले आहेत. उपसा आढळून आल्यास उपसायंत्र जप्त करुन उपसा परवाना १ वर्षाच्या कालावधीसाठी रद्द करण्यात येईल, असेही त्यांनी कळविले आहे.

हेही वाचा >>>कोल्हापूर: पावणे दोन कोटीच्या अपहार प्रकरणी बडा सुत व्यापारी पंकज अग्रवाल अटकेत

शेतकऱ्यांमध्ये नाराजी

पाण्याची टंचाई, मनासारखा वळीव पाऊस पडलेला नाही आणि दुसरीकडे पिके वाळत चालली आहेत. त्यामुळे उपसा बंदी मागे घ्यावी अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा शेतकऱ्यांनी पाटबंधारे कार्यालयात जावून दिला असताना आज पूर्वीचा आदेश पाटबंधारे विभागाने लागू केल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Water diversion in panchganga bhogavati river in kolhapur again amy