विधवा प्रथा बंदीचा ठराव सर्वप्रथम कोल्हापूर जिल्ह्यात झाल्याचा अभिमान – सतेज पाटील

कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने केलेल्या विधवा प्रथा बंदीच्या ठरावाचे रूपांतर शासन प

कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने केलेल्या विधवा प्रथा बंदीच्या ठरावाचे रूपांतर शासन परिपत्रकात झाले आहे. विधवा प्रथा बंदीचा ठराव सर्वात प्रथम करणारे हेरवाड हे कोल्हापूर जिल्ह्यातील गाव असल्याचा अभिमान आहे, असे गौरवोद्गार कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी गुरुवारी काढले.
विधवा प्रथा बंद करण्याचा निर्धार करण्यामध्ये महत्वपूर्ण वाटा असणाऱ्या ग्रामविकास अधिकारी पल्लवी कोळेकर, सरपंच सुरगोंडा पाटील आणि ग्रामपंचायत सदस्यांचे कार्य कौतुकास्पद आहे,असे ते म्हणाले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व दरम्यान हेरवाड गावचा क्रांतिकारी निर्णय सर्वांसाठी मार्गदर्शक आहे. हेरवाड ग्रामस्थांनी आपल्या कृतीतून राजर्षी शाहु महाराजांना आदरांजली अर्पण केली आहे. हेरवाडचे अनुकरण करून जिल्ह्यातील अन्य गावांनी आदर्श निर्माण करावा, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

मराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: We are proud decision ban widowhood first kolhapur district guardian minister satej patil amy

Next Story
कोल्हापूरच्या आंबा जत्रेत ६ मेट्रिक टन आंब्यांची विक्री
फोटो गॅलरी