कोल्हापूर : ऊस दर अधिक देण्याची परंपरा गुजरात राज्याने या वेळीही कायम राखली आहे. गुजरातचा ऊसदर महाराष्ट्राला पेलणार का ? असा प्रश्न शरद जोशी शेतकरी संघटनेने उपस्थित केला आहे. गुजरातचा गणदेवी साखर कारखाना यावेळी दरात सर्वोच्च ठरला आहे.

नुकत्याच संपलेल्या ऊसाची खरेदी किंमत गुजरातच्या कारखान्यांनी जाहीर केली असून, महाराष्ट्रासाठी तो धडाच आहे. गुजरातमधील सहकारी साखर कारखान्यांनी २०२३ — २४ हंगामात गळीतासाठी दिलेल्या शेतकऱ्यांच्या ऊसाला अव्वल दर दिला आहे. तेथील गणदेवी येथील सहकार खांड उद्योग लि. ह्या साखर कारखान्याने एप्रिल २०२४ मध्ये आलेल्या ऊसाला एकूण (तो/वा खर्च धरून) ४,६७५ रुपये प्रतिटन दर देण्याचे जाहीर केले आहे.प्रतिटन ७७० रुपये तोडणी,वाहतूक खर्च वजा करता ३९०५ रुपये देणार आहेत. केवळ ११-४७ टक्के रिकव्हरी असताना ९ लाख,१४ हजार ४९९ टन ऊसाचे गाळप करत १० लाख, ४८ हजार,३३० क्विंटल साखर उत्पादन केले आहे.

hotel politics in maharashtra
पुन्हा काय झाडी, काय डोंगर? महाराष्ट्रात ‘हॉटेल पॉलिटिक्स’ परतण्यामागे काय आहे कारण?
Bench of High Court in Kolhapur
उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरातच व्हावे, पुण्यासाठीचा अशासकीय ठराव अनावधानाने : आ. विश्वजित कदम
What Supriya Sule Said About Bus?
सुप्रिया सुळेंचं वक्तव्य, “टीम इंडियासाठी गुजरातहून बस का आणली या प्रश्नाचं उत्तर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस…”
Swiggy, Zomato, Uber , workers,
महाराष्ट्रातल्या स्विगी, झोमॅटो, ऊबर कामगारांनी कर्नाटककडे पाहावं…
Uddhav Thackeray Slams Mahayuti Govt
उद्धव ठाकरेंची टीका, “महाराष्ट्रात महागळती आणि लीकेज सरकार, यांना लाज, लज्जा, शरम…”
new scheme for poor women in maharashtra
महाराष्ट्रात लाडकी बहीण; मध्य प्रदेशच्या धर्तीवर गरीब महिलांना दरमहा १२०० ते १५०० रुपये
What Sanjay Raut Said?
संजय राऊत यांचं मोठं विधान, “नोव्हेंबरनंतर महाराष्ट्रात आपलाच मुख्यमंत्री”
devendra fadnavis will continue as dcm
दिल्लीतल्या बैठकीत निर्णय, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी कायम राहणार!

आणखी वाचा-एकाच कुटुंबातील पाचजण नृसिंहवाडीत नदीत बुडाले; वजीर रेस्क्यूच्या जवानांनी वाचवले प्राण

गणदेवीने मार्च — ३८०५ रू. व फेब्रुवारी,२४ करता — ३७०५ रू/टन तसेच जानेवारी २४ सह डिसेंबर, नोव्हेबर, ऑक्टो, २३ ह्या चार महिन्यात आलेल्या ऊसाला ३६०५ रू/टन प्रमाणे दर देण्याचे जाहीर केले आहे. हा दर तोडणी, वाहतूक खर्च वजा करून शेतकऱ्यांना मिळणारा निव्वळ दर आहे. बार्डोली साखर कारखान्याची रिकव्हरी १०-८३ टक्के आहे. तो/वा खर्च ७०० रू. दाखवला आहे. ऑक्टो, नोव्हें, डिसे, २३ व जाने.२४ मध्ये आलेल्या ऊसाला ३४२३ रू, तर फेब्रू ३५२३, मार्च ३६२३ रू/टन प्रमाणे निव्वळ दर देणार आहे.

सायन कारखान्याची रिकव्हरी १०-५१ टक्के आहे . (तो/वा खर्च ६८० रू.) त्याने एप्रिल – ३६५४,मार्च – ३५५६, फेब्रू – ३४५६ तर ऑक्टो ते जानेवारीतील ऊसाला ३३५६ रू/ टन दर जाहीर केला आहे. तर कामरेज कारखान्याची रिकव्हरी १०-७२ टक्के आहे. (तो/वा खर्च ७८० रू.) त्याने मार्च -३५५१, फेब्रू – ३४५१ तर ऑक्टो ते जानेवारीतील ऊसाला ३३५१ रू/टन दर जाहीर केला आहे.

आणखी वाचा-मतदान पूर्ण होईपर्यंत थांबायचं नाही गड्या; अमित शहा यांचा कोल्हापुरातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना सल्ला

कारखान्याची रिकव्हरी १०-०७ टक्के आहे. (तो/वा खर्च ७७० रू.) मार्च -३३२५, फेब्रू – ३२७५ तर ऑक्टो ते जानेवारी तील ऊसाला ३२२५ रू/टन दर जाहीर केला आहे. इकडे, चलथान कारखान्याची रिकव्हरी १०- २८ टक्के आहे. (तो/वा खर्च ७१० रू.) मार्च -३२५६, ऑक्टो ते फेब्रूवारीतील ऊसाला ३३२०६ रू/टन दर जाहीर केला आहे. पंडवाई कारखान्याची रिकव्हरी ०९- ७३टक्के आहे.(तो/वा खर्च ७८० रू.) मार्च -३१४१, फेब्रू – ३३२१ तर ऑक्टो ते जानेवारीतील ऊसाला ३१०१ रू/टन दर जाहीर केला आहे.

हे ऊस दर पाहता गुजरात दरात अव्वल ठरले आहेत. तसेच गेल्या १७ वर्षातील महाराष्ट्र व गुजरातच्या ऊस दरातील तफावत प्रचंड आहे. क्षमता व चोख व्यवहार तसेच व्यावसायिक अर्थकारणाचा विचार करून महाराष्ट्रातील पुढाऱ्यांच्या ताब्यात कारखाने देणे चुकीचे ठरले आहे, असे आमच्या शेतकरी संघटनेचे म्हणणे आहे. हे सर्वजण भ्रष्टाचारी व लुटारू आहेत, असे शरद जोशी स्थापित शेतकरी संघटनेचे सहकार आघाडीचे राज्यप्रमुख संजय कोले यांनी म्हटले आहे.