हनी ट्रॅपला कंटाळून तरुणाची आत्महत्या?

मोबाइल पासवर्ड आधारे अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न पोलिस करीत आहेत.

कोल्हापूर : इचलकरंजी येथे एका तरुणाने आत्महत्या केल्याचे रविवारी उघडकीस आले आहे. हनी ट्रॅपला कंटाळून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. गेल्या महिनाभरात हनी ट्रॅपला त्रस्त होऊन दोघांनी आत्महत्या केली आहे. सुतार मळा भागामध्ये ३२ वर्षीय तरुण राहतो. गेल्या काही दिवसापासून त्याचे इतरांशी वागणे बोलणे कमी झाले होते. आज दुपारी राहत्या घरी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. त्यापूर्वी त्याने लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये मोबाइलचा पासवर्डचा उल्लेख केला आहे. त्यामुळे त्याने हनी ट्रॅपला कंटाळून आत्महत्या केल्याचा पोलिसांचा संशय असून घटनास्थळी तशी चर्चा सुरू होती. हनी ट्रॅपच्या जाळय़ात सापडल्यानंतर बदनामी होण्याच्या भीतीने त्याने हे कृत्य केले असावे असा संशय आहे. मोबाइल पासवर्ड आधारे अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न पोलिस करीत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व कोल्हापूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Young man commits suicide after getting fed up with honey trap zws

Next Story
नगररचना संचालकांना लाच स्वीकारताना अटक
ताज्या बातम्या