कर्णधार युसूफ पठाणच्या दिमाखदार फलंदाजीच्या बळावर बडोद्याने सौराष्ट्रचा २६ धावांनी पराभव केला. त्यामुळे बडोद्याने तीनपैकी तीन सामने जिंकत १२ गुणांसह मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पध्रेच्या अव्वल साखळीमध्ये प्रवेश केला आहे, तर तिसऱ्या पराभवानिशी सौराष्ट्रचे आव्हान संपुष्टात आले आहे. युसूफने फक्त २८ चेंडूंत ४ उत्तुंग षटकार आणि ३ चौकारांसह ५४ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
बडोदा : २० षटकांत ७ बाद १४२ (युसूफ पठाण ५४, राकेश सोलंकी २९, आदित्य वाघमोडे २२; अभिषेक भट २/३३, कुलदीप रावल २/५) विजयी वि. सौराष्ट्र : १८.४ षटकांत सर्व बाद ११६ (जयदेव शाह २३, कुलदीप रावल १९; मुनाफ पटेल २/१३, हार्दिक पंडय़ा २/११). गुण : बडोदा ४, सौराष्ट्र ०.