News Flash

कमाईमध्येही धोनीच किंग ! IPL मधून आतापर्यंत कमावलेत कोट्यवधी रुपये, आकडा वाचून तुम्हीही व्हाल थक्क

IPL तेराव्या हंगामात धोनीच्या CSK चं आव्हान साखळी फेरीत संपुष्टात

१५ ऑगस्टर २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या धोनीने युएईत पार पडलेल्या आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नईचं नेतृत्व केलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं असलं तरीही धोनी पुढचे काही हंगाम आयपीएल खेळणार आहे. २००८ सालापासून धोनी आयपीएलमध्ये चेन्नईचं नेतृत्व करतोय. मधल्या दोन वर्षांच्या काळात धोनी पुणे संघाकडून खेळला. मुंबई इंडियन्सनंतर आयपीएलच्या इतिहासात सर्वात यशस्वी संघ आणि कर्णधार अशी ओळख असलेल्या धोनीने आयपीएलमधून आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. आतापर्यंत पार पडलेल्या १३ हंगामाचा इतिहास पाहता कमाईच्या बाबतीत धोनीच अजुनही किंग असल्याचं पुढे आलं आहे.

अवश्य वाचा – स्टम्पमागे धोनी सल्ला देण्यासाठी नसल्यामुळे फिरकीपटूंची कामगिरी खालावतेय – किरण मोरे

Inside Sports Money Ball ने दिलेल्या वृत्तानुसार आतापर्यंत धोनीने आयपीएलमधून तब्बल १३७ कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. या किमतीत सामनावीर, मालिकावीर व इतर बक्षिसांच्या रकमेचा समावेश केलेला नाही. ही रक्कम २०० कोटींपर्यंत जाऊ शकते असा अंदाज आहे. २००८ ते २०१० या काळात धोनीने एकाच बोलीवर चेन्नईचं नेतृत्व केलं. यानंतर २०११ साली चेन्नईने धोनीच्या मानधनात वाढ करत त्याच्यासाठी ८.२ कोटी रुपये मोजले. २०१३ पर्यंत धोनी याच बोलीवर CSK चं नेतृत्व करत होता. २०१४ मध्ये बीसीसीआयने संघमालकांना पहिल्या पसंतीच्या खेळाडूला कायम राखण्यासाठीची किंमत वाढवून १२.५ कोटी इतकी केली. ज्यामुळे २०१५ पर्यंत धोनीने प्रत्येक हंगामात १२.५ कोटी कमावले. पुणे सुपरजाएंट संघाकडूनही त्याला इतकच मानधन मिळत होतं.

२०१८ चा हंगाम सुरु होण्याआधी बीसीसीआयने पहिल्या पसंतीच्या खेळाडूला कायम राखण्यासाठीची किंमत १५ कोटी केली. त्यामुळे २०१८ ते २०२० हे तीन हंगाम धोनीला १५ कोटींचं मानधन मिळत होतं. या यादीमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा हा दुसऱ्या स्थानी येतो. डेक्कन चार्जर्स संघाकडून खेळताना रोहितला ३ कोटींचं मानधन मिळत होतं. २००८ ते २०१० या काळात रोहितने याच बोलीवर डेक्कन चार्जर्सचं प्रतिनिधीत्व केलं. २०११ साली मुंबईने रोहितसाठी ९.२ कोटी रुपये खर्च करत त्याला आपल्या संघात घेतलं. २०१३ पर्यंत तो याच बोलीवर मुंबईकडून खेळत होता. २०१४ पासून रोहित धोनीइतकीच कमाई करतो आहे. आतापर्यंत त्याची IPL मधली कमाई (बक्षिसांची रक्कम वगळून) १३१ कोटींच्या घरात आहे. १२६ कोटींच्या कमाईसह विराट कोहली या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2020 9:57 am

Web Title: 137 crore and counting ms dhoni emerges as highest paid player in ipls history rohit sharma ahead of kohli psd 91
Next Stories
1 स्टम्पमागे धोनी सल्ला देण्यासाठी नसल्यामुळे फिरकीपटूंची कामगिरी खालावतेय – किरण मोरे
2 धोनीकडे युवराज होता, हार्दिकलाही अशाच एका आणखी फिनीशरची गरज – आकाश चोप्रा
3 अजिंक्य रहाणे आक्रमक कर्णधार ! इयन चॅपल यांच्याकडून कौतुक
Just Now!
X