CoronaVirus Outbreak : करोनाच्या तडाख्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. देशात करोनाग्रस्तांची संख्या प्रचंड वाढत आहे. अशा स्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या लढाईचा सामना करण्यासाठी लोकांनी आर्थिक हातभार लावावा, असे आवाहन केले आहे. त्यास उत्तम प्रतिसाद मिळत असून अनेक कलाकार, व्यापारी मंडळी, उद्योगपती, क्रीडापटू, संस्था आणि सर्वसाधारण जनता करोनावर मात करण्यासाठी पुढे सरसावली आहे.

लॉकडाउन काळात केली चोरी अन् थेट गाठलं मॅक्डोनाल्ड्स

नेमबाज इशा सिंग

 

रोहित शर्माची करोनाविरोधात ‘बॅटिंग’; केली ८० लाखांची मदत

विराट कोहली, रोहित शर्मा, पी व्ही सिंधू, सानिया मिर्झा, महेंद्रसिंग धोनी, मिताली राज यासारख्या बड्या आणि सधन क्रीडापटूंनी आपली जबाबदारी ओळखत करोनाग्रस्तांसाठी आर्थिक सहाय्य करण्याचा निर्णय घेतला आहे. पण विशेष म्हणजे भारताची१५ वर्षाची नेमबाज इशा सिंग हिनेदेखील करोनाग्रस्तांसाठी सहाय्यता निधी दिला आहे. इशाने आपल्या कमाईतून ३० हजार रूपयांची मदत PM Cares Fund मध्ये जमा केले आहेत. तिने त्या निधीची पावती ट्विट केली असून ‘देश असेल तर आपण आहोत’ असा संदेश भारतीयांना दिला आहे.

Covid-19 : सलाम! फुटबॉल स्टार मेसीने दिला ३५४ कोटींचा निधी

इशाची मदत करण्याची ओढ पाहून सोशल मीडियावर तिचे कौतुक करण्यात येत आहे. नेटिझन्स तिला सलाम करत आहेत. इतकेच नव्हे तर केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी तिचे ट्विट रिट्विट करून इशाचं कौतुक केलं आहे. ‘तू केवळ १५ वर्षांची आहेस, पण तुझी समज पाहून तूच खरी चॅम्पियन आहेस असं म्हणावंसं वाटतं’, असे त्यांनी ट्विटदेखी केले आहे.

बापरे! क्रिकेटपटूच्या घरात झाला सिलिंडरचा स्फोट; पत्नी गंभीर जखमी

इशाच्या आधी क्रिकेटपटू रोहित शर्मा, विराट कोहली यांनीही पीएम-केयर्स फंड आणि मुख्यमंत्री सहायता निधीला सहकार्य केले आहे. तसेच मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याने केंद्र आणि राज्य सरकारला प्रत्येकी २५ लाख, बीसीसीआयने ५१ कोटी, कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेने ५० लाख केंद्र आणि राज्य सरकारला देण्याची घोषणा केली आहे.