लंडन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून सर्वांना आश्चर्यचकीत करणारी अवघ्या १६ वर्षीय जलतरणपटू रुता मेलूतितने आता, १०० मीटर स्विमिंग स्पर्धेत नवा विश्वविक्रम केला आहे.
जागतिक स्विमिंग चॅम्पियन्स स्पर्धेच्या उपांत्यफेरीत रुताने हा विक्रम केला आहे. याआधी अमेरिकेच्या जेसिका हार्डीने २००९ साली १०० मीटर स्विमिंगमध्ये १ मिनिट ४.४५ सेकंदातात अंतर पार करून विश्वविक्रम नोंदविला होता. हा विक्रम मोडीस काढत लिथूआनिआच्या रुता मेलूतितने हे अंतर १ मिनिट ४.३५ सेकंदात पार करत नव्या विश्वविक्रमाची नोंद केली आहे. याविक्रमासह रुताने स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळविला असला तरी, अंतिम सामन्यातील सुवर्णपदापेक्षा केलेला विश्वविक्रम वाखाडण्याजोगा आहे.
रुता मेलूतित म्हणाली, मी माझे एक मोठे लक्ष्य गाठले याचा मला आनंद आहे. आता अंतिमसामन्यात अशीच कामगिरी मी करेन. तसेच माझ्या स्विमिंग करिअरमधील एक स्वप्न साकार झाले आहे आणि स्पर्धेतील सुवर्णपदक माझ्या कामगिरीवर आणखी एक मोहोर चढेल याची कल्पना आहे. असेही ती म्हणाली.