08 March 2021

News Flash

राष्ट्रकुल टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धा : भारतीयांची विजयी सलामी

भारतीय टेबल टेनिसपटूंनी १९व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या एकेरी प्रकारात दमदार सलामी दिली. पुरुषांमध्ये जुबिन कुमार, अचंता शरथ कमाल, सौम्यजित घोष, अँथनी अमलराज यांनी

| May 10, 2013 01:16 am

भारतीय टेबल टेनिसपटूंनी १९व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या एकेरी प्रकारात दमदार सलामी दिली. पुरुषांमध्ये जुबिन कुमार, अचंता शरथ कमाल, सौम्यजित घोष, अँथनी अमलराज यांनी आपापल्या लढती जिंकल्या. महिलांमध्ये मौमा दास, के. शामिनी, मधुरिका आणि नेहा अगरवाल यांनी सलामीच्या लढती जिंकत दुसरी फेरी गाठली.
जुबिनने सिंगापूरच्या लिआंग मावर ४-३ अशी मात केली. अव्वल मानांकित लिआंगविरुद्ध खेळताना जुबिनने पहिला गेम ११-७ असा सहजतेने जिंकला. सहाव्या गेममध्ये जुबिनकडे ३-२ अशी आघाडी होती. बॅकहँडचा प्रभावी फटक्यासह जुबिनने ७-४ अशी आघाडी घेतली. मात्र लिआंगने आपला खेळ उंचावत जुबिनला चुका करण्यास भाग पाडले आणि गेम १३-११ असा जिंकला. अंतिम आणि निर्णायक गेममध्ये लिआंग थकल्यासारखा जाणवत होता. त्याच्या भरकटलेल्या फटक्यांचा फायदा उठवत जुबिनने या गेमसह ११-६ सामना जिंकला. मिश्र दुहेरी प्रकारात मौमा दास आणि सौम्यजित घोष जोडीने उपांत्य फेरीत प्रवेश केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2013 1:16 am

Web Title: 19th commonwealth table tennis championships indians off to good start in singles event
टॅग : Tennis
Next Stories
1 फग्र्युसन फुटबॉलमधील सर्वोत्तम प्रशिक्षक
2 सायना, सिंधू क्रमवारीत स्थिर
3 माद्रिद टेनिस स्पर्धा : सानिया-बेथानी मॅटेकचे आव्हान संपुष्टात
Just Now!
X