भारत-इंग्लंड पहिल्या कसोटी सामन्यात वीरेंन्द्र सेहवागने कारकिर्दीतलं २३ वं शतक झळकवलं आहे. भारताने एक गडी गमावून ४२ षटकांच्या समाप्तीपर्यंत १८५ धावा केल्या होत्या. भारताची कसोटी क्रिकेटमधील आघाडीची ओपनिंग जोडी वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांनी १३४ धावांची भागीदारी केली. गंभीर १११ चेंडूत चार चौकारांसह ४५ धावा करून ग्रॅमी स्वानच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर आता वीरेंद्र सेहवाग १०९ आणि चेतेश्वर पुजारा २३ धावांवर खेळत आहेत. आज (गुरूवार) सकाळी सुरू झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्याच कसोटी सामन्यात भारताना नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 

भारत – वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, चेतेश्वर पुजारा, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, युवराज सिंग, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), आर. अश्विन, झहीर खान, उमेश यादव आणि प्रग्यान ओझा.
इंग्लंड – अ‍ॅलेस्टर कुक (कर्णधार), नीक कॉम्पटन, जोनाथन ट्रॉट, केविन पीटरसन,  इयान बेल,  समित पटेल, मॅट प्रायर, स्टुअर्ट ब्रॉड, टीम ब्रेसनन, ग्रॅमी स्वान, आणि जेम्स अँडरसन.