आयपीएलचा तेरावा हंगाम खेळण्यासाठी युएईत दाखल झालेल्या चेन्नई सुपरकिंग्जच्या संघातील दोन खेळाडूंना करोनाची लागण झाली. भारतात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने यंदाच्या हंगामाचं आयोजन युएईत करण्याचं ठरवलं. तसेच खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी Bio Security Bubble, पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याची सोय अशा सर्व सुविधा करण्यात आल्या. युएईत दाखल झाल्यानंतर सर्व संघातील खेळाडूंसाठी बीसीसीआयने नियमावली आखून दिली होती. संघाबाहेरील व्यक्तीच्या संपर्कात न येण्यापासून, सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छता असे सर्व नियम पाळणं खेळाडूंना बंधनकारक करण्यात आलं होतं.

चेन्नई सुपरकिंग्जच्या खेळाडूंनी दुबईत दाखल झाल्यानंतर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचा भंग केल्याचं बोललं जातंय. दोन खेळाडूंना करोनाची लागण झाल्यानंतर बीसीसीआयने स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा करणंही थांबवलं आहे. यानिमीत्ताने खेळाडू व त्यांच्यासोबत असणाऱ्या परिवारासाठी बीसीसीआयने नेमके कोणते नियम केले होते ते आपण जाणून घेऊयात…