21 September 2020

News Flash

स्वित्र्झलडचा निसटता विजय

निर्धारित वेळेत १-१ बरोबरीत असणारा इक्वेडोर आणि स्वित्र्झलड यांच्यातला मुकाबला बरोबरीत सुटणार असे चित्र होते. मात्र अतिरिक्त वेळेत रिकाडरे रॉड्रिग्जने दिलेल्या पासवर हॅरिस सेफेरोव्हिकने सुरेख

| June 16, 2014 02:08 am

निर्धारित वेळेत १-१ बरोबरीत असणारा इक्वेडोर आणि स्वित्र्झलड यांच्यातला मुकाबला बरोबरीत सुटणार असे चित्र होते. मात्र अतिरिक्त वेळेत रिकाडरे रॉड्रिग्जने दिलेल्या पासवर हॅरिस सेफेरोव्हिकने सुरेख गोल साधत स्वित्र्झलडला निसटता विजय मिळवून दिला.
सातत्याने गोलसाठी समान पद्धतीने प्रयत्न करणाऱ्या स्वित्र्झलड आणि इक्वेडोर यांच्यातील मुकाबला प्रेक्षकांसाठी थरारक खेळाची पर्वणी ठरला. फ्री-किकवर हेडरद्वारे झालेले गोल या सामन्याचे वैशिष्टय़ ठरले. २२व्या मिनिटाला इनर रेमबटरे व्हॅलेन्सिआने गोल करत इक्वेडोरला झटपट आघाडी मिळवून दिली. वॉल्टर अयोव्हीच्या फ्री-किकवर व्हॅलेन्सिआने हेडरद्वारे जोरदार गोल केला. मध्यंतरानंतर व्हॅलेटिन स्टॉकरच्या जागी अडमिर मेहमेदीला संधी देण्यात आली. दोनच मिनिटांत या संधीचा पुरेपूर फायदा उठवत ४८व्या मिनिटाला अडमिर मेहमेदीने इक्वेडोरच्या खेळाडूंप्रमाणेच फ्री किक आणि हेडर समीकरणाद्वारे गोल करत बरोबरी केली. रिकाडरे रॉडिग्जच्या फ्री-किकवर अडमिरने सहज हेडरद्वारे गोल केला. इक्वेडोरच्या व्हॅलेन्सिआने वारंवार गोलसाठी प्रयत्न केले, मात्र ते अयशस्वीच ठरले. ८६व्या मिनिटाला अरोयोने फ्री-किकद्वारे गोल करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र ते अपुरे ठरले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2014 2:08 am

Web Title: 2014 fifa world cup switzerland beats ecuador 2 1 with last minute goal
Next Stories
1 ‘वॅग्स’ की दुनिया
2 भारतीय युवा खेळाडूंची परीक्षा
3 कोरियावर मात करत भारताची विजयी सांगता
Just Now!
X