युवा (१९ वर्षांखालील) विश्वचषक क्रिकेट स्पर्धा म्हणजे उदयोन्मुख खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करण्याची नामी संधी असते. विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ यांच्यासारखे असंख्य तारे याच व्यासपीठावरून उदयास आले आहेत. शनिवारपासून न्यूझीलंडमध्ये सुरू होणाऱ्या युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत १६ संघ सहभागी होणार आहेत. या वयोगटातील तीन वेळा जगज्जेत्या भारतानेही विश्वचषक जिंकण्याचा निर्धार केला आहे.

शनिवारी पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी आणि यजमान न्यूझीलंडचा गतविजेत्या वेस्ट इंडिजशी सलामीचा सामना होणार आहे. भारतीय संघाची पहिली लढत रविवारी ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. त्यानंतर पपुआ न्यू गिनी आणि झिम्बाब्वेची आव्हाने भारतासमोर असतील. राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ विश्वचषक अभियानासाठी सज्ज झाला आहे.

भारताचा संघ

पृथ्वी शॉ (कर्णधार), शुबमन गिल, आर्यन जुयाल, अभिषेक शर्मा, अर्शदीप सिंग, हार्विक देसाई, मनज्योत कालरा, कमलेश नगरकोटी, पंकज यादव, रियान पराग, इशान पोरेल, हिमांशू राणा, अनुकूल रॉय, शिवम मावी, शिवा सिंग.

ब-गटातील भारताचे सामने

१४ जानेवारी भारत वि. ऑस्ट्रेलिया

१६ जानेवारी भारत वि. पपुआ न्यू गिनी

१९ जानेवारी भारत वि. झिम्बाब्वे