भारताने २०२७मध्ये होणाऱ्या आशिया चषक फुटबॉल स्पर्धेच्या यजमानपदासाठी उत्सुकता दाखवली आहे. यजमानपदाच्या शर्यतीत भारतासोबत इराण, कतार, सौदी अरेबिया, उझबेकिस्तान हे देश आहेत. आशिया फुटबॉल महासंघाकडून (एएफसी) ही माहिती देण्यात आली.

‘‘आशिया चषक २०२७च्या यजमानपदासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. २०२१ मध्ये यजमान देश जाहीर करण्यात येईल. यजमानपदासाठी उत्सुकता दाखवणाऱ्या देशांचे आम्ही आभारी आहोत,’’ असे ‘एएफसी’कडून स्पष्ट करण्यात आले. कतारने १९८८ आणि २००१ मध्ये ही स्पर्धा आयोजित केली होती. तर इराणने १९६८ आणि १९७६मध्ये आशिया चषक आयोजित केला आहे.