22 September 2020

News Flash

Happy Birthday Harsha: जाणून घ्या ‘क्रिकेटच्या आवाजा’चा थक्क करणारा प्रवास

हर्षा भोगले क्रिकेट खेळले की नाही अशी चर्चा अनेकदा होते. मात्र हर्षा खरोखरच क्रिकेट खेळले आहेत.

हर्षा भोगले

‘क्रिकेटचा आवाज’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हर्षा भोगले यांचा आज ५८ वा वाढदिवस. क्रिकेटचे सामने टिव्हीवर लाइव्ह प्रसारित होण्याआधी रेडिओच्या काळात समालोचन करण्यापासून ते क्रिकेट अॅप्सच्या माध्यमातून तज्ज्ञ म्हणून मते मांडण्यापर्यंत हर्षा यांनी क्रिकेट चाहत्यांना क्रिकेट ऐकवले आहे. मागील ३९ वर्षांपासून समालोचन करणाऱ्या हर्षा यांच्याबद्दलच्या अनेक गोष्टी क्रिकेट चाहत्यांना ठाऊक नाही. त्यामुळेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त अशाच काही खास गोष्टींवर टाकलेला प्रकाश…

१)
हर्षा यांचा जन्म १९ जुलै १९६१ रोजी हौद्राबादमधील एका मराठी कुटुंबामध्ये झाले.

२)
हर्षा यांचे वडील ए. डी भोगले हे फ्रेंच भाषाचे प्राध्यापक होते तर आणि शालिनी या मानसशास्त्राच्या प्राध्यापक होत्या.

३)
आंध्रप्रदेश क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये भोगले हे उस्मानीया विद्यापिठाकडून क्रिकेट खेळले आहेत. यावेळी ते भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन, फिरकी गोलंदाज अर्शद आयुब यासारख्या खेळाडूंबरोबर राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळले आहेत.

४)
हर्षा यांचे शालेय शिक्षण हौद्राबाद पब्लिक स्कुलमध्ये झाले. नंतर त्यांनी उस्मानिया विद्यापिठामधून केमिकल इंजिनियरींगमध्ये पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

५)
जाहिरात क्षेत्र मला विशेष आवडते असे त्यांनी अनेकदा सांगितले आहे. पदव्युत्तर अभ्यासनंतर त्यांनी अहमदाबादमधील इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून त्यांनी पदवी घेतली.

६)
शिक्षण झाल्यानंतर त्यांनी एका जाहिरात कंपनीमध्ये दोन वर्ष नोकरी केली. त्यानंतर त्यांनी एका स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनीमध्ये दोन वर्ष नोकरी केली.

७)
ज्यासाठी भोगले ओळखले जातात ती गोष्ट म्हणजे समालोचन. वयाच्या १९ वर्षी हौद्राबादमधून त्यांनी या क्षेत्रात प्रवेश केला. सर्वात पहिल्यांदा त्यांनी ऑल इंडिया रेडिओसाठी समालोचन केले.

८)
१९९१-९२ साली ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टींग कॉर्पोरेशनने त्यांना समालोचन करण्यासाठी आमंत्रित केले होते. १९९२ च्या विश्वचषकाआधी भारताने केलेल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यात त्यांनी समालोचन केले. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टींगने परदेशी समालोचकाला आमंत्रित करण्याची ही पहिलीच वेळ होती.

९)
‘जंटलमन मॅगझीन’ने भोगले यांचा ’50 men you want to know better’ या यादीत समावेश केला होता. तर ‘आऊटलूक मॅगझीन’ने त्यांचा समावेश ‘एखाद्या प्रोफेशनकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलायला लावणारी आठ व्यक्तीमत्व’ या यादीत केला होता.

१०)
२०१० साली पिनस्ट्रोमने तयार केलेल्या खेळांसंदर्भातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीमध्ये भोगले ३५ व्या क्रमांकावर होते. तर सोशल मिडियावरुन प्रभाव पाडणाऱ्या व्यक्तींच्या यादीतही भोगले ३५ व्या क्रमांकावर होते.

११)
२०१० साली ‘द हिंदुस्तान टाइम्स’ने भोगलेंना ‘द ग्रेटेस्ट आयकॉन ऑफ क्रिकेट कॉमेंन्ट्री’ म्हणून गौरवले होते. वाचकांच्या जनमत चाचणीमध्ये भोगले ‘सर्वात लोकप्रिय समालोचक’ ठरले होते.

१२)
भोगले यांनी टिव्हीवर इएसपीएन आणि स्टार स्पोर्टस या वहिन्यांसाठी हर्षा ऑनलाइन, हर्षा अनप्लग्ड आणि स्कूल क्विझ ऑलंपियाड या कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालन केले होते.

१३)
डिस्कव्हरी आणि टीएलसी या वाहिन्यांवरही हर्षा यांनी ‘ट्रॅव्हल वीथ हर्षा भोगले’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते.

१४)
१९९२ साली त्यांचा ‘रेडिओवरील सर्वात मादक’ आवाज असणारे व्यक्ती म्हणून सन्मान करण्यात आला होता.

१५)
१९९९ साली एका वेबसाईटने जगभरातील क्रिकेट चाहत्यांची जनमत चाचणी घेतली त्यामध्ये हर्षा हे जगातील पहिल्या क्रमांकाचे समालोचक असल्याचे मत चाहत्यांनी नोंदवले होते.

१६)
ऑस्ट्रेलियामध्ये २००३-०४ साली झालेल्या ऑनलाइन सर्वेक्षणामध्ये हर्षा हे ‘रेडिओ तसेच टिव्हीवरील सर्वोत्तम समालोचक’ ठरले.

१७)
‘क्रिकइन्फो’ने घेतलेल्या वाचक सर्वेक्षणामध्ये ‘सर्वात आवडते समालोचक’ म्हणून वाचकांनी हर्षा यांची निवड केली. तसेच ‘आवडता समालोचक’, ‘सर्वात निरपेक्ष’ आणि ‘सर्वाधिक माहिती देणारा’ असा तिन्ही स्तरावर हर्षाच सर्वोत्तम असल्याचे मत वाचकांनी या सर्वेक्षणात नोंदवले होते.

१८)
हर्षा यांच्या नावाने ‘हर्षा की खोज’ हा कार्यक्रमही सुरु करण्यात आला होता. भारतातील समालोचन क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या तरुणांना वाव देण्याचा या कार्यक्रमाचा हेतू होता.

१९)
हर्षा भोगले यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. यामध्ये त्यांच्या स्वत:च्या तसेच अझरुद्दीनच्या आत्मरित्राचाही समावेश आहे. ‘व्हाइस ऑफ क्रिकेट’ असं त्यांच्या आत्मचरित्राचे नाव आहे. खेळ विश्वातील आर्थिक बाजू समजावून सांगणारे पुस्तक हर्षा आणि त्यांची पत्नी अनिता भोगले यांनी ‘द विनिंग वे’ नावाने प्रकाशित केले आहे.

२०)
भोगले हे सध्या आयआयएम उदयपूरच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य आहेत.

२१)
हर्षा यांनी अनिता यांच्याशी विवाह केला. अहमदाबादमधील इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये शिक्षण घेताना अनिता आणि हर्षा एकाच वर्गात होते.

२२) हर्षा आणि अनिता यांना चिन्मय आणि सतचित ही दोन मुले असून भोगले कुटुंब मुंबईमध्ये वास्तव्यास आहे.

२३) हर्षा आणि त्यांची पत्नी प्रोरिसर्च नावाची कंपनी चालवतात. क्रिडा क्षेत्रातील महितीच्या देवाण घेवाणीसंदर्भातील कामे ही कंपनी करते.

२४) www.harshabhogle.com ही हर्षा यांची औपचारिक वेबसाईट आहे.

२५) हर्षा हे उत्तम मराठी बोलतात. युट्यूबवर त्यांचे अनेक मराठी व्हिडिओ उपलब्ध आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2019 10:41 am

Web Title: 25 interesting facts about harsha bhogle the voice of indian cricket scsg 91
Next Stories
1 …म्हणून द्रविडच्या नंतर सचिनचा Hall of Fame मध्ये समावेश
2 ‘गॉड ऑफ क्रिकेट’ला ‘हॉल ऑफ फेम’चा सन्मान
3 धोनीचे भवितव्य आणि कोहलीच्या उपलब्धतेकडे लक्ष
Just Now!
X