28 October 2020

News Flash

भारताविरुद्ध २५ टक्के प्रेक्षकांची अपेक्षा -वॉर्नर

‘यंदा आयपीएलमध्ये खेळताना बराच काळ कुटुंबापासून दूर राहावे लागणार आहे.

| September 21, 2020 02:25 am

दुबई : भारताविरुद्ध चालू वर्षांअखेरीस होणाऱ्या ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत २५ टक्के प्रेक्षकांना परवानगी मिळावी, अशी अपेक्षा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने व्यक्त केली आहे. ‘‘भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन बलाढय़ संघ एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. काही फुटबॉल लढतींना २५ टक्के प्रेक्षकांना परवानगी मिळायला सुरुवात झाली आहे. त्याप्रमाणे भारताविरुद्धच्या मालिकेसाठी २५ टक्के प्रेक्षक मैदानात उपस्थित राहिवेत,’’ असे वॉर्नरने सांगितले. ‘‘यंदा आयपीएलमध्ये खेळताना बराच काळ कुटुंबापासून दूर राहावे लागणार आहे. मात्र क्रि के ट स्पर्धाना सुरुवात झाली ही समाधानकारक बाब आहे,’’ असे वॉर्नरने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2020 2:25 am

Web Title: 25 percent crowds should be allowed in india australia series says david warner zws 70
Next Stories
1 IPL 2020 : विराटसेनेची मोहीम आजपासून
2 IPL 2020 : ‘आयपीएल’मधील चार संघांना मुंबईच्या मार्गदर्शकांचे बळ!
3 IPL 2020 : मुंबईचे खेळाडू आकर्षणाचे केंद्रबिंदू!
Just Now!
X