भारत अ आणि न्यूझीलंड अ यांच्यातील दुसरा अनौपचारिक कसोटी सामना अनिर्णित अवस्थेत सुटला आहे. अजिंक्य रहाणेने अखेरच्या दिवशी फलंदाजीचा सराव करत नाबाद शतक झळकावलं. अजिंक्यने १४८ चेंडूत १५ चौकार आणि एका षटकारासह नाबाद १०१ धावा केल्या. न्यूझीलंडने पहिल्या डावात केलेल्या ३८६ धावांचा पाठलाग करताना भारताने ४६७ धावांपर्यंत मजल मारली.

कर्णधार हनुमा विहारीच्या साथीने सलामीला आलेल्या गिलने भारताला दमदार सुरुवात करून दिली. विहारीने ५९ धावा फटकावल्या. गिलच्या नाबाद खेळीत १३ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस भारतीय संघ १५२ धावांनी पिछाडीवर होता. मात्र अजिंक्य आणि विजय शंकरने धडाकेबाज फलंदाजी करत भारताला आघाडी मिळवून दिली. पावसामुळे शनिवारचा दुसरा दिवस पूर्णपणे वाया गेला होता.

न्यूझीलंडकडून डॅरेल मिचेलने नाबाद १०३ धावांची खेळी केली. भारताकडून संदीप वॉरियर, मोहम्मद सिराज, आवेश खान आणि रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.