२४ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी बीसीसीआयने काल भारतीय संघाची घोषणा केली. २ टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआयने युवा फिरकीपटू मयांक मार्कंडेला भारतीय संघात जागा दिली आहे. कुलदीप यादव आणि युजवेंज्र चहल यांच्यासोबत मयांक मार्कंडेला भारतीय संघात जागा दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या, मात्र मार्कंडेला संघात जागा देण्यासाठी निवड समितीने काही कारणांचा विचार केलेला असू शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कारण तिसरे – मुंबई इंडियन्स आणि भारत अ संघाकडून मयांकची सर्वोत्तम कामगिरी

मागच्या हंगामात मयांक मार्कंडने पहिल्या काही सामन्यांमध्ये आपल्या फिरकीने सर्वांना प्रभावित केलं होतं. चेन्नई सुपर किंग्ज आणि सनराईजर्स हैदराबादविरुद्ध त्याने भेदक मारा करत अनेक दिग्गज फलंदाजांना आपल्या जाळ्यात अडकवलं. या कामगिरीमुळे इंग्लंड लायन्स संघाविरुद्ध भारत अ संघाकडून खेळण्याची संधी मयांक मार्कंडेला मिळाली.

इंग्लंड लायन्सविरुद्धच्या सामन्यातही मार्कंडेने ५ बळी घेत आपली उपयुक्तता सिद्ध केली. २०१८-१९ च्या हंगामात मार्कंडे हा पंजाबकडून सर्वात जास्त विकेट घेणारा गोलंदाज ठरला. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला टी-२० मालिकेत स्थान दिलं जाण्याची शक्यता आहे.

कारण दुसरे – कुलदीपला विश्रांती देण्यासाठी मयांकचा पर्याय

आपल्या पदार्पणाच्या काळातच कुलदीप यादवने सर्वांना प्रभावित केलं आहे. अल्पावधीच्या काळातच कुलदीपने रविचंद्रन आश्विन आणि रविंद्र जाडेजा या जोडीची जागा घेतली. अनेक सामन्यांमध्ये कुलदीप यादवने भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली आहे. मात्र आगामी विश्वचषक लक्षात घेता कुलदीपला विश्रांती मिळणं गरजेचं आहे. याचसोबत आयपीएलमध्ये कुलदीप कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळतो. त्यामुळे टी-२० मालिकेत कुलदीपला विश्रांती देऊन मयांक मार्कंडेची फिरकी भारतीय संघ व्यवस्थापन आजमावून पाहु शकतं.

कारण पहिले – २०१९ विश्वचषकासाठी कुलदीप-चहल जोडीला पर्याय

ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिकेत मयांकने संघातली आपली निवड सार्थ ठरवून दाखवल्यास, आगामी २०१९ विश्वचषकासाठी त्याचा कुलदीप-चहल जोडीला पर्याय म्हणून विचार करता येऊ शकतो. कुलदीप आणि चहल यांचं विश्वचषकासाठी भारतीय संघातलं स्थान हे जवळपास निश्चीत मानलं जात आहे, मात्र या दोघांनाही पर्याय म्हणून एका फिरकीपटूला संघात स्थान देण्याचा विराट कोहली आणि संघ व्यवस्थापनाचा प्रयत्न असेल. रविचंद्रन आश्विन आणि जाडेजा यांना संघात जागा मिळण्याची शक्यता कमी असताना मार्कंडेचा विश्वचषकासाठी विचार केला जाऊ शकतो.

अवश्य वाचा – विश्वचषकासाठी संभाव्य १८ खेळाडूंची यादी तयार – एम.एस.के. प्रसाद

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 3 reasons why mayank markande got place in indian side against australia
First published on: 16-02-2019 at 10:16 IST