२३ मार्चपासून मलेशियात सुरु असणाऱ्या सुलतान अझलन शहा हॉकी स्पर्धेसाठी हॉकी इंडियाने राष्ट्रीय शिबीराची घोषणा केली आहे. या शिबीरासाठी ३४ जणांच्या संभाव्य संघाची घोषणा करण्यात आलेली आहे. या शिबीरासाठी सुलतान जोहर स्पर्धेत रौप्य पदक जिंकणाऱ्या भारतीय संघातील खेळाडूंना जागा देण्यात आलेली आहे. याचसोबत ड्रॅगफ्लिकर रुपिंदरपाललाही शिबीरासाठी बोलावण्यात आलं आहे.

गोलकिपर : पी. आर. श्रीजेश, सुरज करकेरा, क्रिशन बहादुर पाठक

बचावपटू : हरमनप्रीत सिंह, गुरिंदर सिंह, वरुण कुमार, कोठाजीत सिंह, सुरेंद्र कुमार, अमित रोहिदास, जर्मनप्रीत सिंह, प्रदीप सिंह, सुमन बेक, मनदीप मोर, बिरेंद्र लाक्रा, रुपिंदरपाल सिंह

मधली फळी : मनप्रीत सिंह, चिंगलेन साना, सुमीत, सिमरनजीत सिंह, निलकांत शर्मा, हार्दिक सिंह, ललित कुमार उपाध्याय, विवेक सागर प्रसाद, यशदीप सिवाच, विशाल अंतिल

आघाडीची फळी : आकाशदीप सिंह, रमणदीप सिंह, गुरजंत सिंह, मनदीप सिंह, दिलप्रीत सिंह, सुमीत कुमार, गुरसाहबजीत सिंह, शैलेंद्र लाक्रा, एस. व्ही. सुनील