ऑस्ट्रेलियाचा कर्णधार शेन वॉट्सनने झळकाविलेल्या शतकामुळे ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात भारतासमोर विजयासाठी १९८ धावांचे अवघड आव्हान ठेवले आहे.
ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात तिसरा व शेवटचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना आज होत असून, शेन वॉट्सनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.  दरम्यान ऑस्ट्रेलियाची सुरुवात डळमळीत झाली. नेहरा, आश्विन आणि युवराजने प्रत्येकी एक बळी मिळवला. पण ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉटसनने नाबाद १२४ धावा करत शतक झळकावले. वॉट्सनने आपली आक्रमक फलंदाजी सुरुच ठेवत शॉन मार्शच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी नोंदविली. अश्विनने मार्शला त्रिफळाबाद करत भारताला यश मिळवून दिले. त्यापाठोपाठ मॅक्सवेल पुन्हा एकदा युवराजचा शिकार ठरला. मात्र, वॉट्सनने ट्रॅव्हिसच्या हेडच्या साथीने धावांची गती कायम ठेवताना चौफेर फटकेबाजी केली आणि वॉट्सनच्या शतकामुळे ऑस्ट्रेलियाने निर्धारित २० षटकांत १९७ धावांचा मोठा डोंगर उभारला.