सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. मात्र याच दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक क्रिकेटमध्ये मानाचं स्थान असलेल्या बिगबॅश टी-२० लीग स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत ब्रिस्बेन हिट विरुद्ध अॅडलेड स्ट्रायकर्स या सामन्यात एक नाट्यमड घडामोड पहायला मिळाली.

ब्रिस्बेन हिट संघाचा नवोदीत खेळाडू जेम्स पॅटिन्सनविरोधात राशिद खानच्या गोलंदाजीवर धावबाद असल्याचं अपील करण्यात आलं. मैदानावरील पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत मागितली, यावेळी तिसरे पंच ग्रेग डेव्हिडसन यांनी बराच कालावधी घेत पॅटिन्सन बाद असल्याचा निर्णय दिला. प्रत्यक्षात पॅटिन्सन यष्टीरक्षकाने यष्टी उडवायच्या आत मैदानात सुरक्षित पोहचला होता, मात्र बॅटचा काही भाग हवेत असल्यामुळे तिसऱ्या पंचांनी पॅटिन्सनला बाद ठरवलं. प्रत्यक्षात हा निर्णय नाबाद असायला हवा होता. या निर्णयानंतर गॅबाच्या खेळपट्टीवर काहीकाळ गोंधळाचं वातावरण पहायला मिळालं.

बऱ्याच कालावधीनंतर पॅटिन्सनने मैदान सोडण्याचा निर्णय घेतला, मात्र अखेर अॅडलेड स्ट्राईकर संघाच्या खेळाडूंनी खिलाडूवृत्ती दाखवत पॅटिन्सलला मैदानात परतण्याचा सल्ला दिला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.