News Flash

विश्वचषक क्रिकेट सट्टेबाजीची उलाढाल चार हजार कोटींपर्यंत

क्रिकेट विश्वचषकातील सामन्यांवर आधारित आंतरराष्ट्रीय सट्टेबाजीच्या रॅकेटची व्याप्ती चार हजार कोटी रुपयांपर्यंत असल्याचे अंमलबजावणी संचालनालयाने स्पष्ट केले आहे.

| March 22, 2015 01:17 am

क्रिकेट विश्वचषकातील सामन्यांवर आधारित आंतरराष्ट्रीय सट्टेबाजीच्या रॅकेटची व्याप्ती चार हजार कोटी रुपयांपर्यंत असल्याचे अंमलबजावणी संचालनालयाने स्पष्ट केले आहे. संचालनालयाने बडोद्यानजीकच्या फार्महाऊसवर धाड टाकली आणि किरण माला व टॉमी पटेल यांना अटक केली. या कारवाईत १५ लॅपटॉप, १०० मोबाइल्स आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली. मालाच्या शहरातील मणिनगर परिसरातील घरातून सट्टेबाजीशी संबंधित कागदपत्रे ताब्यात ताब्यात घेण्यात आली. त्यावेळी ४० बंदुकीची काडतुसेही सापडली.
संचालनालयाने आतापर्यंत १३ व्यक्तींना अटक केली असून, यामध्ये ११ पंटर्सचा समावेश आहे. ११ पंटर्स किरण आणि टॉमी यांच्यासाठी काम करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. संचालनालयाने एका पंटरकडून २५ लाख रुपये ताब्यात घेतले
आहेत.
टॉमी पटेल मेहसाणा जिल्ह्य़ातील उंझा नगरपालिकेत नगरसेवक आहे. २०१३ मध्ये आयपीएल स्पॉट-फिक्सिंगमध्ये सहभागाप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. सामना निश्चित करण्यासाठी बडोदास्थित क्रिकेटपटूला त्याने एक लाख रुपये देऊ केले होते. आयपीएल स्पॉट-फिक्सिंग प्रकरणी नंतर तो जामिनावर सुटला.
विश्वचषकादरम्यान हे दोघे दुबई आणि पाकिस्तानातील सट्टेबाजांच्या संपर्कात होते. एका सामन्यासाठी ते १० कोटीचा सट्टा लावत होते. भारतीय बुकींकडून ते आणखी १० कोटींचा सट्टा वसूल करत होते. मोबाइल फोन्स, स्काइप, बेटफेअर.कॉम या संकेतस्थळांच्या माध्यमातून ही जोडगोळी रॅकेट चालवत असल्याचे संचालनालयाने म्हटले आहे.
माला आणि पटेल यांना यापूर्वी उंझा, मुंबई आणि गोवा येथून सट्टेबाजीचे रॅकेट चालवण्यासाठी ताब्यात घेण्यात आले होते. मात्र त्यांची जामिनावर सुटका झाली. आंतरराष्ट्रीय व्यवहारासाठी त्यांनी हवाला नेटवर्कचा वापर केला. प्रत्येकवर्षी ते २०० आंतरराष्ट्रीय सामन्यांवर ते साधारण २० कोटींचा सट्टा लावत असल्याचे संचालनालयाने स्पष्ट केले आहे.
अटक करण्यात आलेल्या सर्व १३ व्यक्तींना बडोदा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये, पोलिस या सगळ्यांवर गुन्हा दाखल करेपर्यंत अंमलबजावणी संचालनालय त्यांना ताब्यात घेऊ शकत नाही. या सगळ्यांचे दुबईस्थित माफियांशी संबंध आहे का, याविषयी शहानिशा करण्यात येणार असल्याचे संचालनालयाने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2015 1:17 am

Web Title: 4000 crore turnover in world cup betting
टॅग : Cricket Betting
Next Stories
1 क्रीडा संघटनांकडे सत्ताकेंद्र म्हणून पाहू नये – जेटली
2 ऑलिम्पिकसाठी खेळाडूंना सर्व सहकार्य मिळेल – सोनवाल
3 बँक ऑफ इंडिया, आरसीएफ, देना बँक अजिंक्य
Just Now!
X