मुंबई : मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) ४ ऑक्टोबरला होणाऱ्या निवडणुकीसाठी १४ जागांकरिता ४४ जण रिंगणात असल्याचे बुधवारी सायंकाळी निवडणूक अधिकारी डी. एन. चौधरी यांनी जाहीर केले आहे. सत्ताधारी बाळ म्हाडदळकर गटाला युनायटेड फॉर चेंज गटाचे आव्हान असले तरी स्वतंत्र उमेदवारांची भूमिकासुद्धा महत्त्वाची ठरणार आहे.

विजय पाटील यांची अध्यक्षपदावर बिनविरोध निवड झाली आहे. उपाध्यक्षपदासाठी अमोल काळे आणि समीर पेठे या दोघांचे उमेदवारी अर्ज आले आहेत, तर सचिव पदासाठी संजय नाईक, समीर पेठे आणि नदीम मेमन हे तिघे जण उत्सुक आहेत. कोषाध्यक्षपदासाठी जगदीश आचरेकर, इक्बाल शेख आणि मयांक खांडवाला यांनी अर्ज केले आहेत, तर संयुक्त सचिव पदासाठी शाहआलम शेख, संगम लाड आणि मयांक खांडवाला अशी तिरंगी लढत होऊ शकेल. गुरुवारी निवडणुकीचे चित्र स्पष्ट होऊ शकेल. समीर पेठे, मयांक खांडवाला, संगम लाड यांनी एकापेक्षा अधिक अर्ज दाखल केले आहेत.

पदनिहाय उमेदवार

* अध्यक्ष (१ जागा) : विजय पाटील

* उपाध्यक्ष (१ जागा) : अमोल काळे, समीर पेठे

* कोषाध्यक्ष (१ जागा) : जगदीश आचरेकर, इक्बाल शेख, मयांक खांडवाला

* सचिव (१ जागा) : संजय नाईक, समीर पेठे, नदीम मेमन

* संयुक्त सचिव (१ जागा) : शाहआलम शेख, संगम लाड, मयांक खांडवाला

*  कार्यकारिणी सदस्य (९ जागा) : सूरज सामंत, अजय शेठ, गौरव पय्याडे, विहंग सरनाईक, राजेश महंत, घनश्याम नाखवा, सुरेंद्र शेवाळे, अजिंक्य नाईक, मंगेश साटम, अभय हडप, विकास आकलेकर, खोदादाद याझडेगार्डी, लक्ष्मण चौहाण, दीपक मिस्त्री, अमित दाणी, विक्रांत रंभिया, कौशिक गोडबोले, रवी ठाकर, राजेंद्र तळपदे, अमिताभ कापडिया, हेमा फडके, राजेश माधवी, दाऊद पटेल, नदीम मेमन, इक्बाल शेख, एस. एच. जाफ्री, सुरेंद्र हरमळकर, समीर पेठे, मयांक खांडवाला, भास्कर अय्यर, उन्मेश खानविलकर, संगम लाड.