26 January 2021

News Flash

भारताच्या पराभवाची ‘ही’ आहेत पाच कारणं

भारताचा ६६ धावांनी पराभव

पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा ६६ धावांनी पराभव झाला. ऑस्ट्रेलियानं फिंच आणि स्मिथच्या दमदार शतकाच्या बळावर निर्धारित ५० षटकांत ३७४ धावांचा डोंगर उभा केला. ऑस्ट्रेलियानं दिलेल्या ३७५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला ३०८ धावांपर्यत मजल मारता आली. भारताच्या या पराभवाची कारणे जाणून घेऊयात…

नव्या चेंडूवर विकेट घेण्यास भारतीय गोलंदाज अपयशी –
सिडनीचं पिच फलंदाजीसाठी पुरक असल्याचं दिसलं. या विकेटवर नाणेफेक महत्वाची नसल्याचंही सामन्याच्या निकालानंतर दिसून आलं. भारतीय वेगवान गोलंदाजांना महत्वाच्या क्षणी विकेट घेण्यास अपयश आल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघानं धावांच डोंगर उभा केला. सुरुवातीलाच नव्या चेंडूवर विकेट घेण्यात भारतीय संघाला अपयश आलं. कोहलीनं विकेटसाठी शामी, बुमराह आणि सैनी या त्रिकूटाचा वापर केला मात्र एकही विकेट भारताच्या पदरात पडली नाही. वॉर्नर आणि फिंच या सलामीच्या जोडीनं १५६ धावांची सलामी दिली.

बुमराहचा खराब फॉर्म –
जगात अव्वल स्थानी असलेल्या बुमराहाला आपल्या लौकिकास साजेशी गोलंदाजी करता आली नाही. बुमराहनं १० षटकांत ७३ धावा खर्च करताना फक्त एक विकेट घेतली. मागील आठ सामन्यात बुमराहला फक्त दोन बळी घेता आले आहेत. बुमराहाचा फॉर्म भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरला आहे.

युजवेंद्र चहलची महागडी गोलंदाजी –
वेगवान गोलंदाजांना यश मिळत नसल्याच पाहिल्यानंतर सर्वांना आशा होती की चतुर चहल काहीतरी करामत दाखवेल. मात्र, चहलनं १० षटकांत ८९ धावा खर्च करत एक विकटे घेतली. भारताकडून चहल सर्वाधिक महागडा गोलंदाज ठरला आहे.

विराट कोहलीचं अपयश –
भारतीय कर्णधार विराट कोहली धावांचा पाठलाग करताना सर्वात घातक फलंदाजी करतो. मात्र, ३७५ धावांचा पाठलाग करताना कोहलीला आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. कोहली फक्त २१ धावा काढून तंबूत परताला.

आघाडीचे फलंदाज अपयशी –
शिखर धवन आणि हार्दिक पांड्याचा अपवाद वगळता एकाही भारतीय खेळाडूला आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. मयंक अग्रवालने चांगल्या सुरुवातीनंतर आपली विकेट फेकली. तर विराट कोहली, श्रेअस अय्यर आणि राहुल स्पशेल अपयशी ठरले. हार्दिक पांड्या (९०) आणि शिखर धवन (७४) यांनी शतकी भागिदारी करत संघाचा मोठा पराभव टाळला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2020 7:16 pm

Web Title: 5 big reasons for team india lose against australia nck 90
Next Stories
1 भारताचा का झाला पराभव? विराट कोहलीनं सांगितलं कारण…
2 Spirit of Cricket : ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूनं हार्दिकच्या बुटाची बांधली लेस
3 हार्दिक पांड्या अडकला ‘Nervous 90’ च्या दुष्टचक्रात
Just Now!
X