29 February 2020

News Flash

‘ओव्हर-थ्रो’च्या ५ की ६ धावा? आयसीसीच्या उत्तरानंतरही प्रश्न कायम

क्रिकेटमधील अनेक दिग्गजांनी पंचाच्या चुकीच्या निर्णयामुळे इंग्लंडला जेतेपद मिळाल्याचे भाष्य केलं.

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात रंगलेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ओव्हर थ्रोमुळे निर्माण झालेल्या वादावर अखेर आयसीसीने मौन सोडलं आहे. मात्र, आयसीसीच्या उत्तरानंतरही प्रश्न कायमच आहे. इंग्लंडच्या फलंदाजीवेळी ५०व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर मार्टिन गप्तिलच्या ‘ओव्हर-थ्रो’वर इंग्लंडला सहा धावा मिळाल्या. तीन चेंडूंवर नऊ धावा हे समीकरण त्यामुळे दोन चेंडूंवर तीन धावा असे आटोक्यात आले. आणि इंग्लंडला सामना अनिर्णित करण्यात यश आले. त्यानंतर क्रिकेटमधील अनेक दिग्गजांनी पंचाच्या चुकीच्या निर्णयामुळे इंग्लंडला जेतेपद मिळाल्याचे भाष्य केलं. पंचाच्या या खराब कामगिरीमुळे आयसीसीवरही टीका करण्यात आली. आता या वादावरून आयसीसीने मौन सोडलं आहे.

आयसीसीने ओव्हर थ्रोच्या एका धावेवरून सुरू असलेल्या क्रीडा विश्वातील वाद फेटाळून लावला आहे. नियमातून समजलेल्या व्याख्यानुसार मैदानावर उपस्थित असणाऱ्या पंचांनी ओव्हर थ्रोच्या सहा धावा दिल्या आहेत. त्यामुळे आम्ही त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देऊ शकत नाही असे आयसीसीकडून सांगण्यात आले आहे.

आयसीसी सर्वोत्कृष्ट पंचांसाठीचा पाच वेळा पुरस्कार जिंकलेले ऑस्ट्रेलियाचे सायमन टॉफेल यांनीही पंचाचा चुकीच्या निर्णाय असल्याचे सांगितले. टॉफेल यांनी श्रीलंकेचे कुमार धर्मसेना आणि दक्षिण आफ्रिकेचे माराइस इरॅस्मसच्या निर्णयातील त्रुटी दाखवून दिली. फलंदाजांनी पहिली धाव पूर्ण केली आहे की नाही तसेच क्षेत्ररक्षकाने चेंडू हातात घेऊन तो फेकला आहे की नाही, या दोन्हींवर लक्ष ठेवणे पंचांसाठी कठीण असते. चेंडू फेकताना दोन्ही फलंदाज नेमक्या कोणत्या ठिकाणी आहेत, हेसुद्धा पाहण्याची गरज आहे. पंचांच्या या चुकीच्या निर्णयामुळे सामन्याचा निकाल बदलला. अर्थात हे न्यूझीलंडसाठी अन्यायकारक असले, तरी अशा चुका पंचांकडून इतक्या महत्त्वाच्या सामन्यात होऊ शकतात.

नियम काय, घडले काय?
ओव्हरथ्रोशी संबंधित आयसीसी नियमाच्या १९.८ या कलमानुसार, क्षेत्ररक्षकाने चेंडू फेकण्यापूर्वी दोन्ही फलंदाजांनी एकमेकांना ओलांडले असेल, तरच ती धाव ग्राह्य़ धरली जाते.
त्यानंतर चौकाराच्या धावा मोजल्या जातात. पण गप्तिलने चेंडू फेकण्यापूर्वी बेन स्टोक्स आणि आदिल रशीद यांनी दुसऱ्या धावेसाठी परस्परांना ओलांडले नव्हते. त्यामुळे एक ग्राह्य़ धाव अधिक ओव्हरथ्रोनंतरच्या चार अशा पाच धावा मोजायला हव्या होत्या.

First Published on July 16, 2019 3:19 pm

Web Title: 5 runs or 6 icc breaks silence on ben stokes overthrows incident nck 90
Next Stories
1 ‘मला निवृत्ती घेताना विचारलं होतं का?’, धोनीच्या निवृत्तीवरील चर्चेदरम्यान भडकला सेहवाग
2 ‘इंग्लंडने विश्वचषक स्वीकारताना ‘ही’ गोष्ट करायला हवी होती’, महिंद्रा अन् हर्षा भोगलेंचे ट्विट
3 WC 2019 : सचिनही ‘कॅप्टन सुपरकूल’ विल्यमसनच्या प्रेमात
X
Just Now!
X