29 September 2020

News Flash

सेरेनाचा कारकीर्दीतील सातशेवा विक्रमी विजय

वाढत्या वयाबरोबर खेळात परिपक्वता आणणाऱ्या सेरेनाने कारकीर्दीतील ७००व्या विक्रमी विजयाची नोंद केली.

| April 3, 2015 04:11 am

वाढत्या वयाबरोबर खेळात परिपक्वता आणणाऱ्या सेरेनाने कारकीर्दीतील ७००व्या विक्रमी विजयाची नोंद केली. मियामी खुल्या टेनिस स्पर्धेत सबिन लिइस्कीवर मात करत सेरेनाने उपांत्य फेरीत वाटचाल केली. सुरुवातीला चाचपडत खेळणाऱ्या सेरेनाने नंतर मात्र लौकिकाला साजेसा खेळ करत हा विजय मिळवला. या स्पर्धेची सात जेतेपदे नावावर असणाऱ्या सेरेनाने या सामन्यात रॅकेट तोडले, ओरडत रागही व्यक्त केला, तळपत्या सूर्याला उद्देशून शेरेबाजी केली. मात्र लय गवसल्यानंतर लिइस्कीला तिने पुनरागमनाची कोणतीही संधी दिली नाही. ताकदवान सव्‍‌र्हिस हे सेरेनाचे मुख्य अस्त्र आहे. मात्र या सामन्यात सेरेनाच्या सव्‍‌र्हिसमधील अचूकता हरवली. तिच्या हातून तब्बल ५१ चुका झाल्या. मात्र या सगळ्यातून सावरत सेरेनाने ऐतिहासिक विजय साकारला. या स्पर्धेतील सेरेनाचा हा सलग १६वा सलग विजय आहे. अव्वल मानांकित सेरेनाचा उपांत्य फेरीत सिमोन हालेपशी मुकाबला होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2015 4:11 am

Web Title: 700 win for serena williams
टॅग Serena Williams
Next Stories
1 दक्षिण रेल्वे, ओएनजीसीला जेतेपद फेडरेशन बास्केटबॉल स्पर्धा
2 ‘ऑलिम्पिक २०२४’च्या यजमानपदासाठी मोदी सरकार प्रयत्नशील
3 कमाल यांचा राजीनामा
Just Now!
X