विश्वचषक स्पर्धेतील भारत आणि बांगलादेश सामन्यादरम्यान चर्चा रंगली होती ती एका आजींची. होय बरोबर तुम्ही अगदी बरोबर ओळखलंत. टीम इंडियाला चिअर करणाऱ्या ८७ वर्षीय आजींची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली होती. याच आजींना GRANDMOTHER INDIA म्हणत अमूल इंडियाने त्यांच्याबद्दलचा आदर व्यक्त केला आहे. या संदर्भात एक उत्तम जाहिरात तयार करत त्यात आजींचा समावेश करत अमूल इंडियाने हा आदर व्यक्त केला आहे.

अमूल इंडियाने व्यक्त केला आदर

हे पण वाचाभारताच्या विजयानंतर ‘त्या’ आजींना आनंद महिंद्रांनी दिली ही खास ऑफर

बांगलादेश आणि भारत यांच्यातला सामना सुरू होता तेव्हा भारत जिंकावा म्हणून मी गणपतीची प्रार्थना केली होती असं या आजी म्हणाल्या. त्या पिपाणी वाजवून भारतीय संघाला चिअर करत होत्या. विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनीही त्यांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले. चारुलता पटेल असं या ८७ वर्षीय आजींचं नाव आहेत. त्या मूळच्या टांझानियाच्या आहेत. त्यांचे आई वडील भारतात रहात होते. त्यामुळे भारताबाबत त्यांना अभिमान आहे.

हे पण वाचा : त्या भेटीनंतर आजीबाई म्हणतात, ‘विराट आणि रोहितला मी सांगितलं की…’

चारूलता पटेल या ८७ वर्षांच्या आजी बांगलादेशविरूद्धच्या सामन्या दरम्यान पिपाणी वाजवून आणि भारतीय झेंडा खांद्यावर घेऊन टीम इंडियाला चिअर करत होत्या. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांची चांगलीच चर्चा रंगली होती. या आजींची झलक दाखवणारे अनेक क्षण कॅमेरात कैद झाले आहेत. ते फोटो नेटकऱ्यांनी ट्विटही केले आहेत. आजींचा हा उत्साह पाहून टीम इंडियाचा कप्तान विराट कोहली आणि शतकवीर रोहित शर्मा या दोघांनीही त्यांची भेट घेतली. टीम इंडियाने विश्वचषक जिंकावा अशी माझी इच्छा आहे असंही या आजींनी म्हटलं आहे.