News Flash

सलामीवीराची एक धाव, इतर ९ फलंदाज शून्यावर माघारी, जाणून घ्या या अनोख्या सामन्याबद्दल…

दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत नेपाळने केला पराक्रम

नेपाळमध्ये सुरु असलेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत, यजमान संघाने अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. शनिवारी झालेल्या सामन्यात नेपाळच्या महिला संघाने मालदीवचा संघ ११.३ षटकांत माघारी धाडला. मालदीवच्या सलामीवीरानं एक धाव केली आणि इतर नऊ फलंदाजांना या सामन्यात एकही धाव काढता आलेली नाही.

मालदीवने प्रथम फलंदाजी करताना, सलामीवीर ऐमा ऐशाथानं एक धाव काढली. यानंतरच्या सात धावा नेपाळच्या गोलंदाजांनी अतिरीक्त धावांच्या स्वरुपात दिल्या. मालदीवच्या इतर फलंदाज शून्यावर बाद झाल्या. अंजलीने ४ षटकांत अवघी १ धाव देत ४ विकेट घेतल्या. तिला सिता राणा मगर. रुबीने छेत्रीने २ तर सुमन खाटीवाडा आणि करुणा भंडारी यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

नेपाळने आपल्याला मिळालेलं ९ धावांचं लक्ष्य ७ चेंडूत पार केलं. काजल श्रेष्ठा आणि रोमा थापा या जोडीने नेपाळला हा विजय मिळवून दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2019 7:32 pm

Web Title: 9 ducks in a match maldives women batting collapse against nepal makes for a bizarre scorecard psd 91
Next Stories
1 IND vs WI : विराटच्या आक्रमक खेळीवर कर्णधार पोलार्डची प्रतिक्रीया, म्हणाला…
2 IND vs WI : विराट-रोहितच्या शर्यतीत पुन्हा एकदा विराटचीच बाजी
3 IND vs WI : माजी ऑस्ट्रेलियन कर्णधाराला विराटने टाकलं मागे
Just Now!
X