News Flash

ए बी डीव्हिलियर्सचे अविश्वसनीय विक्रम

कामगिरी बघितली तर एबीडीच्या निवृत्तीमुळे क्रिकेटप्रेमींनी नी विशेषत: टीम दक्षिण अफ्रिकेनं काय गमावलंय हे लक्षात येईल

संग्रहित छायाचित्र

क्रिकेटच्या मैदानातली आकडेवारी ही प्रत्येक खेळाडूच्या कर्तृत्वाची मोजपट्टी असते. हा निकष लावला आणि कामगिरी बघितली तर ए बी डीव्हिलियर्सच्या निवृत्तीमुळे क्रिकेटप्रेमींनी नी विशेषत: टीम दक्षिण अफ्रिकेनं काय गमावलंय हे लक्षात येईल. आपल्या नावावर अविश्वसनीय असे विक्रम नोंदवणाऱ्या एबीनं आज निवृत्ती जाहीर केली आणि सच्च्या क्रिकेटप्रेमींना वाईट वाटलं आणि एबीडीचे विक्रम डोळ्यासमोरून तरळले.

एकदिवसीय सामन्यामध्ये सगळ्यात जलद अर्धशतक झळकावण्याचा विक्रम डीव्हिलियर्सच्या नावावर आहे. त्यानं अवघ्या 16 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावलंय. त्याचप्रमाणे एकदिवसीय सामन्यामध्ये सगळ्यात जलद शतक व सगळ्यात जलद दीडशतक झळकावण्याचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे. एबीडीनं 31 चेंडूंमध्ये शतक तर 64 चेंडूंमध्ये दीडशतक झळकावण्याचा विक्रम केलेला आहे.

केवळ टी-20 व एकदिवसीयच नाही तर कसोटी फॉरमॅटमध्येही एबीडीनं नेत्रदीपक कामगिरी केलेली आहे. कसोटीमध्ये एका डावात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो दक्षिण अफ्रिकेच्या फलंदाजांमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानं 278 नाबादची खेळी केली आहे. तर आयसीसी क्रिकेट रँकिंगमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे 935 इतके गुण कमावणारा तो दक्षिण अफ्रिकन खेळाडू आहे. साउथ अफ्रिकन क्रिकेटर ऑफ दी इयर हा मानाचा पुरस्कार एबीडीनं 2014 व 2015 अशा दोन वेळा पटकावला आहे.

हेवा वाटावा अशा 50.66 सरासरीनं एबीडीनं कसोटीमध्ये धावा केल्या असून 22 शतकांसह 8,765 धावा फटकावणारा एबीडी सर्वाधिक धावांच्या बाबतीत चौथा दक्षिण अफ्रिकन खेळाडू आहे. तर एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो जॅक कॅलिस खालोखाल धावा करणारा दुसरा अफ्रिकन आहे. एबीडीनं 228 सामन्यांमध्ये 9577 धावा केल्या असून त्याचा स्ट्राइक रेट 101.09 आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2018 5:55 pm

Web Title: a b de villiers has some unbelievable records in his name
Next Stories
1 थकलेल्या वादळाची कहाणी सुफळ संपूर्ण! डीव्हिलियर्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
2 कसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याच्या प्रस्तावावर गांगुली म्हणतो …
3 मोजक्या क्रिकेटरसिकांच्या साक्षीने महिला आयपीएलची रंगीत तालीम
Just Now!
X