World Test Championship : सिडनी येथे झालेला तिसरा कसोटी सामना बरोबरीत सोडवत भारतीय संघानं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आपलं आव्हान कायम ठेवलं आहे. न्यूझीलंड संघाकडून भारताला कडवी टक्कर मिळत आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्यासाठी भारताला यापुढील कसोटी सामन्यांत विजय मिळवणं आवश्यक आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका ही भारताची पाचवी मालिका आहे. सिडनी कसोटी सामन्यानंतर आयसीसीनं कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचं गुण आणि क्रमवारी जारी केली आहे.

आतापर्यंत झालेल्या सामन्यांत भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी प्रत्येकी ८-८ सामने जिंकले आहेत. भारताच्या खात्यात ४०० गूण असून ऑस्ट्रेलियाच्या खात्यात ३३२ गुण आहेत. गुणांमध्ये एवढी तफावत असूनही ऑस्ट्रेलियाचा संघ WTC गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहचला आहे. भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या न्यूझीलंड संघानं सात सामने जिंकले असून त्यांच्यानावावर ४२० गुण आहेत. विजयाच्या टक्केवारीनुसार ऑस्ट्रेलिया अव्वल क्रमांकावर आहे. तर भारत दुसऱ्या आणि न्यूझीलंड तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंडमध्ये पहिल्या दोन संघामध्ये स्थान मिळवण्याची टक्कर आहे. न्यूझीलंड भारतापेश्रा ०.२ गुणांनी मागे आहे. भारतीय संघाचा पुढील सामना ऑस्ट्रेलियाबरोबर आहे. त्यासामन्यात काय निकाल लागतोय त्यावर भारतीय अव्वल संघ कोणता हे स्पष्ट होईल.