IND Vs AUS : सिडनी येथे सुरु असलेला तिसरा कसोटी सामना रंगतदार अवस्थेत पोहचला आहे. तिसऱ्या दिवशी भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. कर्णधार अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी लागोपाठ बाद झाल्यामुळे भारतीय संघ अडचणीत आला. हनुमा विहारीला हेजलवूडनं अचूक थ्रोनं धावबाद केलं. दोन्ही कसोटी सामन्यात अपयशी ठरणाऱ्या हनुमा विहारीला पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयश आलं. पहिल्या डावात ३८ चेंडूचा सामना करताना हनुमा विहारीला फक्त चार धावा करता आल्या. हेजलवूडनं अचूक थ्रो करत विहारीचा डाव संपुष्टात आणला. दुसऱ्या कसोटीत कोहलीला धावबाद करणाऱ्या हेजलवूडनं तिसऱ्या कसोटीत विहारीला माघारी धाडलं.
भारतीय संघानं तीन गड्यांच्या मोबदल्यात १४५ धावा केल्या होत्या. त्याचवेळी हेजवूडनं यानं अफलातून क्षेत्ररक्षण करत भारताला चौथा धक्का दिला. विहारीनं नाथन लायनच्या चेंडूवर शॉट मारत एक धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, समोर उभा असलेल्या हेजलवूडनं ड्राइव्ह मारत चेंडू आडवला अन् तितक्याच वेगानं अचूक थ्रो केला.
पाहा व्हिडीओ –
A piece of fielding brilliance by Josh Hazlewood to get rid of Hanuma Vihari
Just how good was that run out?!pic.twitter.com/c2OYQgxrtB
— ICC (@ICC) January 9, 2021
सोशल मीडियावर हेजलवूडच्या क्षेत्ररक्षणाचं कौतुक होतेय. दुसऱ्या सत्रात पुजारा-पंत जोडी भारतीय संघाची धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय संघ अद्याप १४४ धावांनी पिछाडीवर आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 9, 2021 8:25 am