News Flash

इराणी चषक क्रिकेट स्पर्धा : कर्नाटकचा २४४ धावांत खुर्दा

वेगवान गोलंदाज वरुण आरोनने सहा बळी घेतल्यामुळेच शेष भारत संघाने गतविजेत्या कर्नाटकचा पहिला डाव २४४ धावांत गुंडाळला आणि इराणी चषक क्रिकेट सामन्यात पहिला दिवस गाजविला.

| March 18, 2015 02:25 am

वेगवान गोलंदाज वरुण आरोनने सहा बळी घेतल्यामुळेच शेष भारत संघाने गतविजेत्या कर्नाटकचा पहिला डाव २४४ धावांत गुंडाळला आणि इराणी चषक क्रिकेट सामन्यात पहिला दिवस गाजविला.  कर्नाटकच्या मयांक अगरवालने अर्धशतक करूनही त्यांचा डाव ४ बाद १०७ असा अडचणीत सापडला होता. करुण नायर व अभिषेक रेड्डी यांनी अर्धशतके लगावताना शतकी भागीदारीही केली. त्यामुळेच कर्नाटकने ही मजल मारली़  शेष भारताने दिवसअखेर एक बाद २० धावा केल्या़
संक्षिप्त धावफलक
कर्नाटक (पहिला डाव) :   सर्वबाद २४४ (मयांक अगरवाल ६८, करुण नायर ५९, अभिषेक रेड्डी ५४, वरुण आरोन ६/६३) वि़ शेष भारत (पहिला डाव ) : १ बाद २० धावा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2015 2:25 am

Web Title: aaron six for limits karnataka to 244
Next Stories
1 अनुत्तीर्ण झालेल्या ६ संघांचे प्रगतिपुस्तक
2 सातत्यपूर्ण कामगिरीवर भर – श्रीकांत
3 बॅलेमुळे माद्रिद विजयी पथावर
Just Now!
X