27 November 2020

News Flash

एबी डीव्हिलियर्स झाला बाबा; बाळाचा फोटो सोशल मीडियावर केला शेअर

तुम्ही पाहिलात का 'तो' खास फोटो?

बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहली लवकरच बाबा होणार आहे. त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या मध्यातच पालकत्व रजादेखील मंजूर करून घेतली आहे. याचदरम्यान, विराटचा खास मित्र आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डीव्हिलियर्स नुकताच तिसऱ्यांदा बाबा झाला आहे. डीव्हिलियर्स दांपत्य तिसऱ्यांदा आई-बाबा झाल्याची गोड बातमी डीव्हिलियर्सने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली. ११ नोव्हेंबर २०२० रोजी आम्हाला कन्यारत्न प्राप्ती झाली, अशा कॅप्शनसह एक फोटो डीव्हिलियर्सने शेअर केला. मुलीचं नाव येन्ते डीव्हिलियर्स असं ठेवलं असल्याचीही माहिती त्याने दिली.

पाहा फोटो-

 

View this post on Instagram

 

A post shared by AB de Villiers (@abdevilliers17)

डीव्हिलियर्स पती-पत्नी पुन्हा आई-बाबा होणार असल्याची बातमी त्याची पत्नी डॅनियल डिव्हिलियर्स हिने गरोदर असल्याचा फोटो शेअर करत १४ जुलैला दिली होती. डॅनियलने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत ‘हॅलो बेबी गर्ल’ असे कॅप्शन लिहिले. तिच्या पोस्टवर शुभेच्छांचा पाऊस पडला होता. कर्णधार विराट कोहली आणि एबी डीव्हिलियर्स हे दोघे IPLमध्ये बंगळुरू संघाकडून अनेक वर्ष खेळत आहेत. त्यांची एकमेकांशी चांगली मैत्री आहे. या दोघांच्या पत्नीदेखील चांगल्या मैत्रिणी आहेत. त्यामुळे बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मानेही एबी डिव्हिलियर्स आणि डॅनियल या दोघांचे अभिनंदन केले होते. ‘अभिनंदन डॅनिएल आणि एबी! तुम्ही खूपच आनंदाची बातमी दिलीत’, अशी कमेंट अनुष्काने केली होती.

एबी डीव्हिलियर्स आणि डॅनियल यांचा प्रेमविवाह झाला आहे. पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर २०१२ मध्ये डीव्हिलियर्सने गर्लफ्रेंड डॅनियल स्वार्ट हिला प्रपोज केलं. मार्च २०१३ मध्ये दक्षिण आफ्रिकेतच या दोघांचा भव्य-दिव्य लग्नसोहळा पार पडला. २०१६ पर्यंत डीव्हिलियर्सने दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर २०१६ मध्ये त्याने आपली पत्नी, दोन मुलं आणि कुटुंबीय यांना पुरेसा वेळ देण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2020 10:26 am

Web Title: ab de villiers becomes father of third child shares adorable picture of newborn daughter yente de villiers see pic vjb 91
Next Stories
1 सट्टेबाजीला कायदेशीर मान्यता मिळावी!
2 कोहलीच्या अनुपस्थितीत भारतावर अधिक दडपण -पाँटिंग
3 गोव्यात फुटबॉल कार्निव्हल
Just Now!
X