मोहाली कसोटीच्या दुसऱया दिवशी भारतीय फिरकीपटूंना द.आफ्रिकेच्या फलंदाजांना वेसण घालण्यात यश आले असून आफ्रिकेचा निम्मा संघ तंबूत दाखल झाला आहे. पण, सध्या दमदार फॉर्मात असलेला द.आफ्रिकेचा हुकमी एक्का अजूनही मैदानात जम बसवून आहे. खरंतर त्यालाही रविंद्र जडेजाने आपल्या फिरकी जाळ्यात ओढलं होतं पण, डी’व्हिलियर्सचं नशीब बलवत्तर ठरलं असचं म्हणता येईल कारण डी’व्हिलियर्स बाद झालेला चेंडू ‘नो बॉल’ असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे माघारी परतलेल्या डी’व्हिलियर्सला पुन्हा मैदानात बोलावण्यात आले आणि स्टेडियमवर उपस्थित सर्व भारतीय चाहत्यांची निराशा झाली.

त्याचं झालं असं की, सामन्याच्या ४४ व्या षटकात जडेजाच्या गोलंदाजीवर डी’व्हिलियर्स मोठा फटका मारण्याच्या नादात झेल देऊन बसला. यष्टीरक्षक वृद्दीमान साहाकडून डी’व्हिलियर्सचा झेल निसटला पण, मागे स्लिपला उभ्या असलेल्या कर्णधार कोहलीने क्षणार्धात तो अचूक टीपला आणि टीम इंडियाचा जल्लोष सुरू झाला. डीव्हिलियर्स देखील निराश होऊन माघारी परतला पण सामन्याच्या तिसऱया पंचांना रिव्ह्यूमध्ये जडेजाने फेकलेला चेंडू ‘नो बॉल’ असल्याचे लक्षात आले. मैदानाची सीमारेषा ओलांडणार इतक्यातच डीव्हिलियर्सला पंचांनी पुन्हा बोलावले.

 

ab2

ab3