10 April 2020

News Flash

RCB ला दिलासा, एबी डिव्हीलियर्स आयपीएलमध्ये खेळणार

खासगी संकेतस्थळाला डिव्हीलियर्सचं स्पष्टीकरण

एबी डिव्हीलियर्स (संग्रहीत छायाचित्र)

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या एबी डिव्हीलियर्सने आपल्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी दिलेली आहे. पुढची काही वर्ष डिव्हीलियर्स आयपीएलमध्ये खेळणार आहे, खुद्द डिव्हीलियर्सने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. एका खासगी संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत डिव्हिलियर्सने हे स्पष्टीकरण दिलं आहे. यानंतर RCB ने ही आपल्या ट्विटर अकाऊंटवर डिव्हीलियर्सच्या स्पष्टीकरणाची माहिती दिली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतर त्याच्या अनेक चाहत्यांना धक्का बसला होता. मात्र निवृत्तीनंतर डिव्हीलियर्स आयपीएलमध्ये खेळणार की नाही याबद्दल मात्र संभ्रम निर्माण होता. अखेर डिव्हीलियर्सने केलेल्या स्पष्टीकरणानंतर त्याच्या चाहत्यांचा जीव अखेर भांड्यात पडला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2018 4:13 pm

Web Title: ab de villiers confirms he ll keep playing the ipl
टॅग Ipl,Rcb
Next Stories
1 …आणि फेडरर ठरला आयसीसीचा ‘नंबर १’ फलंदाज
2 PHOTOS : महिला क्रिकेट संघातील ‘त्या’ दोघींनी घेतली सहजीवनाची शपथ
3 …आणि पंचांनी मैदानावरच कापले होते गावस्कर यांचे केस
Just Now!
X