क्रिकेटमधील धडाकेबाज खेळाडूंची नावे घ्यायची झाली, तर त्यात अग्रस्थानी असलेले नाव म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू ए बी डिव्हिलियर्स. त्याने काही महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली, पण तो इतर स्पर्धांमध्ये खेळत आहे. मोठ्या विश्रांतीनंतर त्याने मंगळवारी झान्सी प्रीमियर लीगमध्ये ‘अभी भी वो दम है’, अशा पद्धतीची कामगिरी करून दाखवली.

डिव्हिलिर्यने झान्सी प्रीमियर लीगच्या त्वेवाने स्पार्टन विरुद्ध जोसी स्टार्स यांच्यात झालेल्या सराव सामन्यात धडाकेबाज खेळी केली. त्याने धुवाँधार फलंदाजी केली. स्पार्टन संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ बाद २१७ धावा केल्या. यातील ९३ धावा डिव्हीलियर्सच्या फ्लॅजितून आल्या होत्या. या धावा करताना त्याने केवळ ३१ चेंडू खेळले. या खेळीतील त्याचा स्ट्राईक रेट हा तब्बल ३००चा होता.

३४ वर्षीय एबी डिव्हीलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केल्यानंतर प्रथमच कोणत्याही प्रकारच्या क्रिकेट स्पर्धेत त्याने सहभाग घेतला होता. त्याची ही खेळी तुफानी झाली. दक्षिण आफ्रिकेचा संघ २०१९च्या विश्वचषकात त्याच्या विना मैदानात उतरणार आहे. त्यामुळे त्याची खेळी पाहून प्रतिस्पर्धी संघांना नक्कीच हायसे वाटले असेल.

आता स्पार्टन विरुद्ध केपटाऊन ब्लित्झ यांच्यातील शुक्रवारच्या सामन्यात न्यूलॅंडमध्ये पुन्हा डिव्हिलियर्स खेळताना दिसणार आहे.