महाराष्ट्र जलतरण संघटनेच्या अध्यक्षपदी पुण्याचे माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू अभय दाढे यांची, तर सचिवपदी सोलापूरचे वरिष्ठ संघटक झुबीन अमेरिया यांची एकमताने निवड झाली.
संघटनेच्या अस्थायी समितीचे अध्यक्ष अभय दाढे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत आगामी चार वर्षांकरिता पदाधिकाऱ्यांची निवड झाली. यापूर्वी दोन वेळा अध्यक्ष असलेले राजेंद्र जाधव यांच्या जागी दाढे यांची, तर किशोर वैद्य यांच्या जागी अमेरिया यांची निवड झाली. खजिनदारपदी पुण्याच्या नीता तळवलीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडणुकीस भारतीय जलतरण महासंघाचे सहसचिव मेकाला रामकृष्णन व महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सदस्य मनोज भोर हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते. मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश डी. जी. देशपांडे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम केले.
कार्यकारिणी  पुढील प्रमाणे
अध्यक्ष-अभय दाढे (पुणे), उपाध्यक्ष-जयप्रकाश दुबळे (नागपूर), जयसिंग बन्सी (मुंबई शहर), सुरेश कदम (नांदेड), प्रभाकर घरत (रायगड), सचिव-झुबीन अमेरिया (सोलापूर), सहसचिव-मयूर व्यास (मुंबई), फारूख शेख (जळगाव), संभाजी भोसले (नागपूर). खजिनदार-नीता तळवलीकर (पुणे). कार्यकारिणी सदस्य-सदानंद जोशी (रत्नागिरी), शंकरभाऊ कोळी (रायगड), रत्नाकर क्षीरसागर (बीड), शिरीष कोल्हापुरे (सोलापूर), मधुकर वैद्य (औरंगाबाद), शत्रुघ्न बिरकड (अकोला), प्रकाश कदम (कोल्हापूर).