News Flash

मुंबईच्या अभिषेक नायरने टाकले एका षटकात १७ चेंडू

मुंबईचा अष्टपैलू क्रिकेटपटू अभिषेक नायरने देवधर करंडक स्पर्धेत दक्षिण आणि पश्चिम विभागादरम्यान झालेल्या सामन्यात पश्चिम विभागाकडून खेळताना चक्क १७ चेंडूंचे एक षटक टाकले.

| March 13, 2013 08:22 am

गुवाहाटी – मुंबईचा अष्टपैलू क्रिकेटपटू अभिषेक नायरने देवधर करंडक स्पर्धेत दक्षिण आणि पश्चिम विभागादरम्यान झालेल्या सामन्यात पश्चिम विभागाकडून खेळताना चक्क १७ चेंडूंचे एक षटक टाकले. या सामन्यात बारावे षटक टाकण्यासाठी आलेल्या नायरने पहिल्या चेंडूत जी एच बिहारीला बाद केले, परंतु त्याचा हा आनंद फार काळ टिकला नाही. पंचांकडून त्याने टाकलेल्या तिस-या चेंडूला वाइड घोषित करण्यात आल्याने तो चिडला. त्यानंतर त्याने दहा वाइड चेंडू आणि एक नो बॉल टाकला. त्याचे हे षटक संपण्याचे नावच घेत नव्हते. बघता बघता नायरने या षटकात तब्बल १७ चेंडू टाकले. नायर त्याच्या आक्रमक स्वभावासाठी प्रसिद्ध आहे.

नायरने टाकलेल्या ‘त्या’ षटकाचे चेंडूनिहाय वर्णन

पहिला चेंडू – जी एच बिहारी बाद
दूसरा चेंडू – दिनेश कार्तिकने फाइन लेगवर २ धावा घेतल्या
तिसरा चेंडू – वाइड, १ अतिरिक्त धाव
चौथा चेंडू –  धाव नही (योग्य चेंडू)
पाचवा चेंडू – वाइड, १ अतिरिक्त धाव
सहावा चेंडू – वाइड, १ अतिरिक्त धाव
सातवा चेंडू – वाइड, १ अतिरिक्त धाव
आठवा चेंडू – धाव नाही (योग्य चेंडू)
नववा चेंडू – वाइड, १ अतिरिक्त धाव
दहावा चेंडू –  धाव नाही (योग्य चेंडू)
आकरावा चेंडू – वाइड, १ अतिरिक्त धाव
बारावा चेंडू – वाइड, १ अतिरिक्त धाव
तेरावा चेंडू – वाइड, १ अतिरिक्त धाव
चौदावा चेंडू – वाइड, १ अतिरिक्त धाव
पंधरावा चेंडू – वाइड, १ अतिरिक्त धाव
सोळावा चेंडू –  नो बॉल, १ अतिरिक्त धाव
सतरावा चेंडू – धाव नाही (योग्य चेंडू)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 13, 2013 8:22 am

Web Title: abhishek nayar balled seventeen balls in one over in deodhar trophy
टॅग : Deodhar Trophy
Next Stories
1 चौथ्या कसोटीपूर्वी वॉटसन भारतात परतेल – मायकल क्लार्कला विश्वास
2 भारताचा पाकिस्तानवर विजय
3 नदालची आगेकूच
Just Now!
X