पाकिस्तान-श्रीलंका कसोटी मालिका

रावळपिंडी  : कसोटी आणि एकदिवसीय अशा दोन्ही क्रिकेट प्रकारांमध्ये पदार्पणात शतक नोंदवणारा सलामीवीर अबिद अली हा पहिला फलंदाज ठरला आहे. २००९च्या अतिरेकी हल्ल्यानंतर देशात प्रथमच झालेली श्रीलंकेविरुद्धची पहिली कसोटी पावसामुळे रविवारी अनिर्णितावस्थेत संपली. अबिदने २०१ चेंडूंत ११ चौकारांसह नाबाद १०९ धावांची खेळी साकारली, तर शैलीदार फलंदाज बाबर आझमने (नाबाद १०२) तिसरे कसोटी शतक साकारले. त्यामुळे पाकिस्तानने पाचव्या दिवसअखेर पहिल्या डावात २ बाद २५२ धावांपर्यंत मजल मारली. त्याआधी, धनंजय डीसिल्व्हाच्या शतकाच्या बळावर श्रीलंकेने पहिला डाव ६ बाद ३०८ धावांवर घोषित केला.