माजी कसोटीपटू सचिन तेंडुलकरचे मत
जगातल्या वेगवान गोलंदाजांचा सामना करीत फलंदाजी करण्यापेक्षा चरित्रपटासाठी कॅमेऱ्याचा सामना करणे अवघड असल्याचे मत महान फलंदाज सचिन तेंडुलकरने व्यक्त केले.

‘अनेक वर्षे मी क्रिकेट खेळलो आणि कॅमेरा टिपत गेला. अचानक कॅमेऱ्यासमोर विशिष्ट गोष्ट करण्याचे मला सांगण्यात आले. हा अनुभव माझ्यासाठी सर्वस्वी वेगळा होता. गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत फलंदाजी करणे माझ्यासाठी सोपे होते,’ असे सचिनने सांगितले. आयडीबीआय फेडरल लाइफ इन्शुरन्स यांच्यातर्फे मुंबई, दिल्ली आणि कोलकाता येथे होणाऱ्या अर्धमॅरेथॉनचा सदिच्छादूत म्हणून सचिनच्या नावाची घोषणा करण्यात आली, त्या वेळी तो बोलत होता. तो पुढे म्हणाला, ‘‘अभिनयाचा मी कधीही विचार केला नाही. क्रिकेटच्या तुलनेत अभिनय करणे केव्हाही कठीणच आहे. खेळण्याचा मी पुरेपूर आनंद घेतला आहे.’’

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: लवकरच सगळेजण हार्दिक पंड्याचे गोडवे गातील; कायरॉन पोलार्ड हार्दिकच्या मागे भक्कम उभा
Real Reason Behind MSD's Early Test Retirement
VIDEO : ‘जर तुला मूल हवे असेल तर …’, साक्षीने धोनीच्या कसोटी क्रिकेटमधून लवकर निवृत्तीचे खरे कारण सांगितले
Mumbai Ranji cricketers get same match fee from MCA as BCCI
मुंबईच्या रणजी क्रिकेटपटूंची चांदी! ‘एमसीए’कडून ‘बीसीसीआय’इतकेच सामन्याचे मानधन
IPL 2024 Sachin Tendulkar explained how to face the bowlers
IPL 2024: सचिन तेंडुलकरचा कानमंत्र, गोलंदाजांचा सामना करताना फलंदाजाने बॉल कसा ओळखावा? वाचा नेमकं काय म्हणाला

‘‘आरोग्य ही मोठी ताकद आहे. कोणत्याही खेळात कारकीर्द घडवण्यासाठी जीवनशैली निकोप असणे अत्यावश्यक आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना विभिन्न स्वरूपाच्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी शारीरिक क्षमतेबरोबरच मानसिक कणखरतेची गरज आहे. क्रिकेट खेळायचे असेल तर तुमचे शरीर चेंडूचे घाव सोसण्यासाठी तयार हवे. तुमची वेदना प्रतिस्पर्धी संघासमोर यायला नको,’’ असे सचिनने सांगितले.

‘सचिन : अ बिलिअन ड्रीम्स’ या चरित्रपटाद्वारे सचिन चंदेरी दुनियेत पदार्पण करीत आहे. इंग्लंडचे जेम्स इस्र्किन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.