News Flash

“द्रविड कोच असता तर करण जोहरची ‘ते’ करायची हिंमत झाली नसती”

अभिनेता-विनोदी कलाकारानं दिलं मत

राहुल द्रविड आणि करण जोहर

श्रीलंका दौर्‍यावर भारतीय संघाने विजयी सलामी दिली आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने यजमानांना ७ गडी राखून पराभूत करून तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. शिखर धवनच्या नेतृत्वात टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी केली. विराट कोहलीच्या नेतृत्वातील रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह या खेळाडूंची भरणा असलेली टीम इंग्लंड दौर्‍यावर आहे.

त्यामुळे नव्या दमाच्या खेळाडूंचा भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेला आहे. या संघाचे मुख्य प्रशिक्षकपद माजी भारतीय कर्णधार राहुल द्रविडकडे देण्यात आले. द्रविडच्या मार्गदर्शनाखाली ही टीम वेगळ्या स्टाईलमध्ये दिसली. पहिल्या वनडेतील विजयानंतर कोच रवी शास्त्री सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागले.

अभिनेता आणि विनोदी कलाकार रेहमान खाननेही एक ट्वीट करत द्रविडचे कौतुक केले आहे. तो म्हणाला, ”राहुल द्रविड हा श्रीलंका दौर्‍यासाठी प्रशिक्षक आहे. हार्दिक पंड्यासाठी रवी शास्त्री ते राहुल द्रविड असे संक्रमण कठीण आहे. राहुल द्रविड हा भारताचा प्रशिक्षक असता, तर करण जोहरने पंड्याला कॉफी विथ करण शोमध्ये आमंत्रित करण्याची हिंमत केली नसती.”

 

हेही वाचा – IND vs SL : ‘त्या’ घटनेनंतर मी विचलित झालो; पृथ्वी शॉनं केलं मान्य

२०१९मध्ये हार्दिक पंड्या आणि केएल राहुल ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये पाहुणे म्हणून आले होते. शो दरम्यान पांड्याने महिलांविषयी अश्लील भाष्य केले. त्यांच्या या वक्तव्यावर सर्वत्र टीका झाली. हे प्रकरण जसजसे वाढत गेले तसतसे बीसीसीआयने राहुल आणि पंड्यावर काही काळ बंदी घातली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2021 11:19 am

Web Title: actor and comedian rehman khan speaks about hardik pandyas koffee with karan controversy adn 96
Next Stories
1 IND vs SL : ‘त्या’ घटनेनंतर मी विचलित झालो; पृथ्वी शॉनं केलं मान्य
2 IND vs SL: वाढदिवस, वनडे पदार्पण आणि झंझावाती अर्धशतक! इशान किशनने नोंदवला खास विक्रम
3 क्रॅमनिकला नमवून आनंदने स्पार्कासन करंडक जिंकला
Just Now!
X