20 September 2020

News Flash

अ‍ॅक्युरेट एसेसची आगेकूच प्रीमियर टेनिस स्पर्धा

अ‍ॅक्युरेट एसेस संघाने लागोपाठ दुसरा विजय नोंदवत प्रीमियर टेनिस लीगमध्ये बाद फेरीच्या दिशेने वाटचाल कायम राखली. त्यांनी शार्प स्मॅशर्स संघावर २६-२१ अशी मात केली.

| December 1, 2014 04:29 am

अ‍ॅक्युरेट एसेस संघाने लागोपाठ दुसरा विजय नोंदवत प्रीमियर टेनिस लीगमध्ये बाद फेरीच्या दिशेने वाटचाल कायम राखली. त्यांनी शार्प स्मॅशर्स संघावर २६-२१ अशी मात केली.
डेक्कन जिमखाना क्लब येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत बेसलाइन बॉम्बर्स संघानेही अपराजित्व कायम राखले. साखळी गटात त्यांनी डॅझलिंग डय़ुसेस संघाचा २६-२० असा पराभव केला.
अ‍ॅक्युरेट संघाच्या रिशिका सुंकारा हिने एकेरीत सौजन्या बाविशेट्टी हिला ६-२ असे हरविले. पाठोपाठ तिचा सहकारी तेजस चौकुलकर याने आकाश वाघ याचा ६-५ (७-१) असा चिवट लढतीनंतर पराभव केला. श्रीराम बालाजी याने अ‍ॅक्युरेट संघाचे वर्चस्व राखताना सनमसिंग याला ६-५ (७-३) असे पराभूत केले. विष्णू वर्धन याने इती मेहता हिच्या साथीत मिश्रदुहेरीत पी. विघ्नेश व शामिनी बालू यांच्यावर ६-३ अशी मात केली. शेवटच्या पुरुष दुहेरीत मात्र अ‍ॅक्युरेट संघाच्या बालाजी व अरुण प्रकाश यांना विजयंत मलिक व सनमसिंग यांच्याकडून २-६ असा पराभव स्वीकारावा लागला.
बेसलाइन संघाच्या रश्मी तेलतुंबडे हिला एकेरीच्या पहिल्या लढतीत अंकिता रैना हिच्याकडून २-६ असा पराभव स्वीकारावा लागला. मात्र तिचा सहकारी विजयसुंदर प्रशांत याने ख्रिस्तोफर मार्क्स याचा ६-३ असा पराभव केला.
त्यानंतर बेसलाइन संघाचा स्टार खेळाडू साकेत मायनेनी याने जीवन नेंदुन्चेळियन याच्यावर ६-२ अशी मात केली. पाठोपाठ त्यांच्या केदार शहा व प्रार्थना ठोंबरे यांनी मोहित मयूर व श्वेता राणा यांना ६-५ (७-५) असे संघर्षपूर्ण लढतीनंतर पराभूत केले. मायनेनी याने रूपेश रॉय याच्या साथीत दुहेरीत जीवन नेंदुन्चेळियन व काझा शर्मा यांना ६-४ असे हरविले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 1, 2014 4:29 am

Web Title: acurat asos premier tennis
Next Stories
1 रिअल माद्रिदचा सलग १६वा विजय
2 एअर इंडिया, महिंद्रा, शुभम, महाराष्ट्र पोलीस उपांत्य फेरीत
3 अजात शत्रू!
Just Now!
X