अ‍ॅडम गिलख्रिस्ट, ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक

Recruitment for assistant professor post
मुंबईच्या TISS मध्ये ‘या’ पदासाठी भरती होणार! २८ एप्रिलआधी करा अर्ज, जाणून घ्या पात्रता निकष
Operation Meghdoot, Siachen,
विश्लेषण : पाकिस्तानला चकवा देत सियाचिनवर कब्जा… थरारक ‘ऑपरेशन मेघदूत’ मोहीम कशी फत्ते झाली?
chip manufacturing infrastructure
पोस्टाच्या तिकिटाएवढी दिसणारी सेमीकंडक्टर चिप नक्की कशी तयार होते?
sourav ganguly
पंत तंदुरुस्त, पण सिद्ध करण्यासाठी वेळ हवा – गांगुली

पंचांच्या निर्णयासाठी तो कधीही थांबला नाही. बाद झाल्यावर तो थेट माघारी परतायचा. पण काळ बदलला. आता काळ पंच पुनर्आढावा प्रक्रियेचा (डीआरएस) आहे आणि त्याबद्दल बऱ्याच गोष्टी घडताना दिसत आहेत. एकीकडे भारतामध्ये बीसीसीआयकडून नव्याने ‘डीआरएस’चा वापर होत आहे, तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूंनी यावर खरपूस टीका केली. भारताचा ‘डीआरएस’ वापरण्याचा निर्णय स्वागतार्ह असून ते याचा कसा उपयोग करतात, हे महत्त्वाचे ठरेल. तंत्रज्ञान तुम्हाला अचूक माहिती देते, पण ‘डीआरएस’बद्दल काही शंका मनात कायम आहेत, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी महान यष्टीरक्षक-फलंदाज अ‍ॅडम गिलख्रिस्टने व्यक्त केले. ऑस्ट्रेलियातील वुलाँगाँग  विद्यापीठ आणि सर डॉन ब्रॅडमन फाऊंडेशन यांच्यातर्फे मुंबईत आयोजित केलेल्या शिष्यवृत्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘लोकसत्ता’ला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये त्याने ‘डीआरएस’, सध्याचे क्रिकेट, ऑस्ट्रेलियाचे चार सलग पराभव, त्यासाठीची उपाययोजना, भारताच्या दौऱ्यावर त्यांनी काय करायला हवे, त्याचबरोबर क्रिकेटवर यापुढे कोण वर्चस्व राखेल, याबाबत आपली मते व्यक्त केली.

* सध्या क्रिकेट अधिक व्यावसायिकझाले आहे. त्यामुळे धावा आणि बळी मिळवण्यावर भर दिला जातो. यामुळे क्रिकेटचा आनंद कमी झाला असे वाटते का?

सध्याच्या खेळाडूंविषयी मला जास्त माहिती नाही. पण ते नक्कीच खेळाचा आनंद घेत असावेत. प्रत्येक देशात क्रिकेटची लोकप्रियता वाढत आहे. सध्याच्या घडीला क्रिकेट अधिक व्यावसायिक झाला आहे. मार्केटिंग आणि प्रायोजक या गोष्टी वाढत आहेत. त्यामुळे खेळाडूंना पैसेही भरपूर मिळतात. क्रिकेटचे कार्यक्रमही व्यस्त झाले आहेत. त्यांच्याकडे फार कमी वेळ असतो. विश्रांतीही मिळत नसावी. त्यांच्यापुढील आव्हाने वाढली आहेत. खेळाचा वेग वाढला. त्यामुळे ते अधिक अचूक राहत असतील. पण या काही कारणांमुळे क्रिकेटमध्ये बदल झाला हे नक्की.

* तू बऱ्याचदा बाद झालास की पंचांकडे न पाहता थेट माघारी परतायचास, हे साऱ्यांनीच पाहिले आहे. पण सध्याच्या घडीला ज्या पद्धतीने डीआरएसचा वापर होतो, त्याबद्दल काय सांगशील?

जेव्हा ‘डीआरएस’ आले तेव्हा ते मला पसंत नव्हते, पण कालांतराने तो खेळाचा भाग होत गेला. तंत्रज्ञान तुम्हाला अचूक माहिती देते, पण ‘डीआरएस’बद्दल काही शंका मनात कायम आहेत. एका चेंडूवर तुम्ही बाद आहात किंवा नाही, याबद्दल चोख माहिती मिळायला हवी, पण तसे होताना दिसत नाही. भारताने या मालिकेत ‘डीआरएस’ वापरण्याचे उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. पण ते याचा वापर कसा करतात, हे पाहणे उत्सुकतेचे असेल. मी अशी कल्पना करतो की, जर कोहलीच्या बाबतीत ‘डीआरएस’बद्दल जर काही दुर्दैवी घटना घडली तर तो नक्कीच या गोष्टीला विरोध करेल किंवा त्याची तक्रार करेल.

* दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात स्टीव्हन स्मिथला ज्या पद्धतीने डीआरएसवापरल्यावर बाद दिले गेले, त्यावर शेन वॉर्ननेही टीका केली, त्याबद्दल काय वाटते?

‘डीआरएस’च्या तंत्रज्ञानाबाबत साशंकता आहे. खेळाडू चुका करतात, तसे पंचही करतात, तेही माणूसच आहेत. ‘डीआरएस’मुळे काही वेळा नाबाद खेळाडूला बाद ठरवण्यात आले आहे. त्यामुळे ‘डीआरएस’चा अभ्यास तुम्हाला करायला हवा. स्मिथच्या बाबतीत जे घडले ते दुर्दैवीच होते. याबाबत टीकाही झाल्या. स्मिथला पंचांनी बाद दिले होते. स्मिथने ‘डीआरएस’ची मागणी केली, त्यानंतरही त्याला बाद दिले. सरतेशेवटी हा निर्णय मान्य करायला हवा.

* तू विश्वविजेत्या संघात होतास, बरीच स्थित्यंतरे तू पाहिली आहेस. सध्याच्या घडीला होणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या संघाच्या पराभवांविषयी काय वाटते?

सध्याच्या घडीला त्यांनी बरेच काही शिकण्याची गरज आहे. ऑस्ट्रेलियाने मायकेल क्लार्कसारखा कर्णधार गमावला आहे. त्याची पोकळी भरून काढणे महत्त्वाचे आहे. सलग चार सामन्यांमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला, पण चारपैकी तीन सामन्यांमध्ये ते काहीवेळा आघाडीवर होते. त्यांनी ती आघाडी गमावली आणि पराभूत झाले. पर्थच्या कसोटी सामन्यात ते विजयासमीप पोहोचले असते. पण दुसऱ्या डावात त्यांची लय बिघडली.

* भारत दौऱ्यावर ऑस्ट्रेलियाच्या संघाने काय करायला हवे?

पहिल्यांदा त्यांनी वातावरणाशी जुळवून घ्यायला हवे. खेळपट्टी निरखून पाहायला हवी, कारण भारतामध्ये गेल्या काही सामन्यांमध्ये फिरकीला पोषक खेळपट्टय़ा पाहायला मिळाल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा संघ आक्रमक क्रिकेट खेळतो, हे साऱ्यांनाच माहिती आहे. पण भारतीय दौऱ्यावर जेव्हा ते येतील, तेव्हा त्यांनी संयम बाळगायला हवा.

* क्रिकेटमध्ये सुरुवातीला वेस्ट इंडिज, त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि आता भारतीय संघ वर्चस्व गाजवत आहे. यापुढे कोणता संघ वर्चस्व गाजवेल, असे वाटते?

सध्याच्या घडीला क्रिकेटमध्ये भरपूर स्पर्धा वाढली आहे. प्रत्येक देश चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे कोणत्याही संघाला दुबळा समजणे चुकीचे ठरेल. बांगलादेशने इंग्लंडला कसोटी सामन्यात पराभूत केले होते. त्यांची अन्य क्रिकेटच्या प्रकारांमधील कामगिरीही नेत्रदीपक अशी आहे. त्यांनी जर खेळाचा स्तर उंचावला तर ते नक्कीच वर्चस्व गाजवू शकतात.