The Big Bout Indian Boxing league स्पर्धेत गुजरात जाएंट संघाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक विजेता आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक विजेत्या अमित पांघलने या स्पर्धेत आपल्या विजयाची हॅटट्रीक केली आहे. अमित सोबतच सरीता देवी, दुर्योधन नेगी, आशिष कुमार, पूनम, राजेश नरवाल, चिराग आणि स्कॉटलंडचा बॉक्सर स्कॉट फॉरेस्ट हे खेळाडू यंदा गुजरातच्या संघाचं प्रतिनिधीत्व करत आहेत. अदानी उद्योगसुमहाकडे गुजरात जाएंट संघाची मालकी आहे. प्रो-कबड्डीत गुजरात फॉर्च्युनजाएंट संघानंतर लिग क्रीडा प्रकारात अदानी उद्योगसमुहाचा हा दुसरा संघ आहे. २१ डिसेंबर रोजी या स्पर्धेची अंतिम फेरी रंगणार असून, गुजरात जाएंट संघ विजेतेपदासाठीचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.

टीम इंडियाला वन-डे मालिकेआधी धक्का; ‘हा’ खेळाडू दुखापतग्रस्त

मेरी कोमच्या पंजाब पँथर्स संघावर ५-२ ने मात करुन गुजरात संघाने आपलं उपांत्य फेरीतलं स्थान निश्चीत केलं. सरीता देवी आणि अमित पांघल यांनी गुजरातच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. ऑलिम्पिक आणि इतर महत्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या तयारीसाठी बॉक्सिंग लीग स्पर्धा उत्तम व्यासपीठ असल्याचं अमितने यावेळी बोलताना सांगितलं. गुजरातव्यतिरीक्त पंजाब पँथर्स, ओडीशा वॉरियर्स, बॉम्बे बुलेट्स, एन.ई. रोहिनोज आणि बंगळुरु ब्रॉलर्स हे संघ सहभागी झाले आहेत.

IPL 2020 Auction : जाणून घ्या तारीख, वेळ, ठिकाण, कधी आणि कुठे दिसणार?

“कुस्ती असो किंवा बॉक्सिंग, भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत आपला दमखम दाखवला आहे. या स्पर्धेत तळागाळातील खेळाडूंना आपलं कौशल्य दाखवायची संधी मिळावी यासाठी आम्ही या स्पर्धेत सहभागी झालो आहेत. अशा प्रकारच्या क्रीडा स्पर्धांना टीव्ही वाहिन्यांवर अधिकाधीक प्रसिद्धी मिळाली तर अनेक खेळाडू या खेळाकडे करिअरच्या दृष्टीकोनातून पाहतील”, असे अदानी उद्योग समुहाचे व्यवस्थापकीय संचालक प्रणव अदानी यांनी सांगितले.