भारताच्या बी.अधीबन या माजी राष्ट्रीय विजेत्या खेळाडूने जागतिक चषक बुद्धिबळ स्पर्धेच्या तिसऱया फेरीकडे वाटचाल केली आहे.
अधीबन याने ब्राझीलचा ग्रँड मास्टर अलेक्झान्डर फीर याच्यावर स्पर्धेच्या दुसऱया फेरीत मात करत तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला आहे. स्पर्धेत बी.अधीबनने उत्तम डाव साकारला.
स्पर्धेच्या पहिल्या फेरीपासूनच बी.अधीबनने बळकट सुरूवात केली आहे. पहिल्या फेरीत रशियाच्या एवगेनी अलीकसीव्ह याच्यावर ब्लिट्झ डावांव्दारे मात केली होती. दुसऱया फेरीत देखील विजयी खेळी कायम राखत अधीबनने स्पर्धेच्या तिसऱया फेरीच्या दिशेने पाऊल टाकले आहे.