News Flash

काश्मीर ते कन्याकुमारी सायकलवर; अदिलनं मोडला नाशिकच्या तरुणाचा विक्रम

गिनिज बुकमध्ये नोंदवला विक्रम

सायकलपटू आदिल तेली

काश्मीरच्या बारामुल्ला येथील 23 वर्षीय सायकलपटू आदिल तेलीने गिनिज बुकमध्ये नवा विक्रम नोंदवला आहे. आदिलने काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतचा म्हणजेच 3600 किमीचा प्रवास 8 दिवस  दीड तासात पूर्ण केला. त्याने नाशिकच्या 17 वर्षीय ओम महाजनला मागे टाकले. ओमने नोव्हेंबर 2020मध्ये हाच प्रवास 8 दिवस 7 तास आणि 38 मिनिटात पूर्ण केला होता.

 

आदिलने सोमवारी 22 मार्च 2021 रोजी सकाळी 7 वाजता आपला प्रवास सुरू केला. श्रीनगरच्या लाल चौक येथील क्लॉक टॉवर येथून त्याने आपल्या प्रवासाची सुरुवात केली. मंगळवार 30 मार्च रोजी सकाळी 8 वाजता त्याने आपले लक्ष्य गाठले.

आदिलने राज्यस्तरावर आणि काश्मीर विद्यापीठासाठी अनेकवेळा चांगली कामगिरी केली आहे. त्याने श्रीनगर ते लेह दरम्यानचे 44 किमी अंतर 26 तास 30 मिनिटांत पार केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 30, 2021 11:44 am

Web Title: adil teli broke the world record of cycling from kashmir to kanyakumari adn 96
Next Stories
1 आयपीएलपूर्वी विराट असणार क्वारंटाइन?…वाचा सविस्तर
2 भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणला करोनाची लागण
3 जैव-सुरक्षा खेळाडूंसाठी हानिकारक!
Just Now!
X