29 September 2020

News Flash

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : आदित्य-उमेशच्या गोलंदाजीमुळे विदर्भ उपांत्य फेरीत

विदर्भाचा उपांत्य सामना केरळशी २४ जानेवारीपासून वायनाड (केरळ) येथे होणार आहे.

आदित्य सरवटे

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा

वसीम जाफरचे द्विशतक, आर. संजयची धडाकेबाज फलंदाजी, आदित्य सरवटेची अष्टपलू कामगिरी आणि उमेश यादवच्या भेदक माऱ्याच्या जोरावर विदर्भाने उत्तराखंडावर एक डाव आणि ११५ धावांनी दणदणीत विजय नोंदवला. याच विजयाच्या बळावर गतविजेत्या विदर्भाने सलग दुसऱ्या वर्षी रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. विदर्भाचा उपांत्य सामना केरळशी २४ जानेवारीपासून वायनाड (केरळ) येथे होणार आहे.

विदर्भाने उत्तराखंडचा पहिला डाव ३५५ धावांवर गुंडाळला. प्रत्युत्तरात विदर्भाने पहिल्या डावात ६२९ धावा करून २७४ धावांची आघाडी घेतली. मग आदित्य (५५ धावांत ५ बळी) व उमेशच्या (२३ धावांत ५ बळी) माऱ्यापुढे उत्तराखंडचा दुसरा डाव १५९ धावांत आटोपला.

विदर्भाच्या युवा संघाकडून मुंबईचा पराभव

पार्थ रेखांडेच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर विदर्भाने कर्नल सी. के . नायडू करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबई संघाचा २९४ धावांनी दारुण पराभव करून उपांत्य फे रीतील प्रवेश निश्चित केला. शुक्रवारी पहिल्या डावात विदर्भाने ३३१ धावा केल्यानंतर मुंबईचा १५४ धावांवर खुर्दा उडाला. त्यामुळे विदर्भने १७७ धावांची आघाडी दुसऱ्या दिवशी घेतली. शनिवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी विदर्भाने दुसऱ्या डावात २२१ धावा करून पाहुण्या मुंबईसमोर ३९९ धावांचे लक्ष्य दिले. या लक्ष्याचा पाठलाग करणारा मुंबईचा संघ ३५.१ षटकांत १०४ धावांवर गारद झाला. विदर्भाने २९४  धावांनी विजय प्राप्त केला.पार्थने ३६ धावा देत ६ गडी बाद केले. या विजयाच्या बळावर विदर्भाने सहा गुणांची कमाई केली.

संक्षिप्त धावफलक

* उत्तराखंड (पहिला डाव) : १०८.४ षटकांत सर्व बाद ३५५

* विदर्भ (पहिला डाव) : १८४ षटकांत सर्व बाद ६२९

* उत्तराखंड (दुसरा डाव) : ६५.१ षटकांत सर्व वाद १५९ (मलोलन रंगराजन २, दीपक धपोला ३; आदित्य सरवटे ५/५५, उमेश यादव ५/२३)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2019 1:39 am

Web Title: aditya umesh bowled vidarbha in the semifinals
Next Stories
1 खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा : महाराष्ट्राची आघाडी कायम
2 धोनी क्रिकेटचा सुपरस्टार; ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकांची स्तुतीसुमनं
3 IND vs AUS : मालिका विजयासोबत भारतीय संघाच्या खात्यात अनोख्या विक्रमाची नोंद
Just Now!
X