एरोफ्लोट बुद्धिबळ स्पर्धा : मॉस्कोत सुरू असलेल्या एरोफ्लोट बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रॅँडमास्टर वैभव सुरीने सहाव्या फेरीत अव्वल मानांकित रशियाच्या व्लाडिस्लाव आर्टेमिएवला पराभवाचा धक्का दिला. वैभवने ७१ चालींमध्ये हा विजय मिळवला. या विजयामुळे २३ वर्षीय वैभवला स्पर्धेत चार गुणांसह संयुक्तपणे तिसरे स्थान मिळाले.

अझरबैजानच्या राउफ मेमेडोवने आर्मेनियाच्या मॅन्युअल पेट्रोसिनविरुद्ध बरोबरी राखली. त्यामुळे मेमेडोव पाच गुणांसह अग्रस्थानी आहे. रशियाच्या सनन सुगिरोवने त्याच्याच देशाच्या वादिम झ्वागिन्सेवला नमवत ४.५ गुणांसह दुसरे स्थान राखले.

वैभव सुरी

भारताच्या वैभव सुरीसोबत भरत सुब्रम्हण्यम, बी. अधिबान, अरविंद चिथमबरम, अर्जुन एरिगायसी यांचे प्रत्येकी चार गुण आहेत. अधिबान, सुब्रम्हण्यम, चिथमबरम, कार्तिकेयन मुरली यांच्या लढती बरोबरीत सुटल्या. आर. प्रागनंधाने सर्जी ग्रिगोरियांट्सविरुद्धचा डाव बरोबरीत सोडवला.