News Flash

Video : भारतीयांचे आभार मानताना सुनील छेत्री भावुक; म्हणाला…

आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत भारताने मिळवला ऐतिहासिक विजय

सुनील छेत्री

भारतीय फुटबॉल संघाने आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेच्या अ गटातील सलामीच्या सामन्यात थायलंडचा ४-१ असा धुव्वा उडवला. आशियाई चषक स्पर्धेत भारताने ५५ वर्षानंतर पहिला विजय मिळवला. या सामन्यात कर्णधार सुनील छेत्रीने दोन गोल करून अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीला मागे टाकण्याचा पराक्रम केला. भारताने १९६४ नंतर प्रथमच आशियाई स्पर्धेत विजय मिळवला. छेत्रीने आशियाई स्पर्धेत आतापर्यंत पाच गोल केले आहेत. २०११च्या स्पर्धेत त्याने तीन गोल केले होते आणि तो या स्पर्धेत सर्वाधिक गोल करणारा भारतीय खेळाडू ठरला आहे. थालडंवरील विजयानंतर छेत्रीने भारतीयांना भावनिक साद घातली आहे.

भारताची पुढील लढत संयुक्त अरब अमिरातीबरोबर १० जानेवारी आणि बहरिनबरोबर १४ जानेवारीला होणार आहे. त्याआधी भारतीय फुटबॉल महासंघाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात छेत्रीने भारतीयांना खेळाडूंचे मनोबल उंचावण्याचे आवाहन केले आहे. तो म्हणाला, ”आम्ही इथपर्यंत मजल मारू शकलो, ते केवळ तुमच्या पाठिंब्यामुळेच. तुमचे हे प्रेम असेच राहु द्या. संघाला पुढील वाटचालीसाठी त्याची आवश्यकता आहे.”

Next Stories
1 मालिका विजयानंतर विराट-अनुष्काचं Private सेलिब्रेशन
2 IND vs AUS : ‘भारत आर्मी’च्या खास गाण्यावर ऋषभ पंतचा मैदानावर भन्नाट डान्स
3 IPL 2019 : IPL भारतातच; या तारखेपासून रंगणार थरार
Just Now!
X